घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे मंत्री फुगतात; सुप्रिया सुळेंनी नाराज मंत्र्यांची उडवली खिल्ली

Supriya Sule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आपल्याला हवी असणारी खाती न मिळाल्याने शिंदे गटातील कहाणी मंत्री नाराज आहेत. त्यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी “आजकाल बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत. हे हास्यास्पद आहे, असे म्हणत या नाराज मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘आजकाल नेत्यांचे मोबाईल नॉटरीचेबल येत आहेत. हे सुद्धा हस्यास्पद आहे. नेत्यांचा फोन सदैव रिचेबल असायला हवा. तुमच्याकडे ही काय मोबाईल नॉट रिचेबलवाली पद्धत सुरू झाली आहे, असे मला दिल्लीवाले विचारत असतात, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.

यावेळी सुळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला. त्या म्हणाल्या की, आपल्या राज्याला हे हॉटेल पॉलिटिक्स परवडणारे नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन हॉटेलमधे बसायचे आणि राज्याला वाऱ्यावर सोडायचे हे आपल्याला परवडणारे नाही.