माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार; दरेकरांच्या विधानावर बोलण्यास सुप्रियाताईंचा नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केल्यानंतर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

प्रविण दरेकर यांनी महिलांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर, मी याविषयी काहीही बोलणार नाही. माझ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

तर गाल आणि थोबाडही रंगवू शकतो- रुपाली चाकणकर

दरम्यान, प्रवीण दरेकरजी, तुमच्या बोलण्यावरून तुमच्या पक्षाची संस्कृतीही दिसून येते. तुम्ही या विधानबद्दल माफी मागावी. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांचा अवमान करणाऱ्याचा गाल आणि थोबाडही रंगवू शकतो, याची जाणीव ठेवावी, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिला.

You might also like