हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “संसदेतमध्ये चांगल भाषण झालं की, लगेच 4 वाजता माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते. यानंतर माझ्या नवऱ्याचा मला मेसेज असतो, लव्ह लेटर आ गया..” असा किस्सा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितला आहे. भाजप सरकार विरोधात काही बोलायला गेलो तर इडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयची चौकशी लगेच मागे लागते, असा आरोप आजवर विरोधकांकडून अनेकवेळा करण्यात आला आहे. या संदर्भातीलच एक किस्सा सुप्रिया सुळे यांनी देखील सांगितला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, मी जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये भाजपविरोधात बोलते तेव्हा लगेच माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस पाठवली जाते. माझे भाषण 2 वाजता झाले की, लगेच 4 वाजता माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटिस येते. पार्लमेंटमध्ये मोबाईल नसतो, बाहेर आल्यावर नवरा म्हणतो म्हणजेच त्याचा मेसेज आलेला असतो की, लव्ह लेटर आ गया…” त्यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर संपूर्ण सभेत हशा पिकते.
सुप्रिया सुळे पुढे म्हणतात की, “माझा नवरा इन्कम टॅक्स लेटरला लव्ह लेटर म्हणतो. तोच इन्कम टॅक्सचा प्रश्न, तेच उत्तर आणि परत तीच नोटीस येते. भाषण केलं की तिचं नोटीस तीच फाईल.. तेच उत्तर… असं आमचं चाललं आहे. गोलगोल.. पण मला भाजपला एक सांगायचं आहे.. सुप्रिया सुळेची ताकद ही तिची इमानदारी आहे.”
दरम्यान, यापूर्वी देखील माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी आपल्याला वारंवार येणाऱ्या इन्कम टॅक्सच्या नोटीशीविषयी भाष्य केले होते. त्यावेळी देखील त्यांनी “माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात तीन भाषणं केल्यानंतर हे घडलं आहे. ज्या दिवशी तिसरं भाषण केलं त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली होती” असा गौप्यस्फोट केला होता. आता हाच किस्सा त्यांनी एका कार्यक्रमात देखील बोलून दाखवला आहे.