अन् सुप्रियाताईंनी पवारांच्या पायात बूट घातला; मोदीही बघतच राहिले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देशभरातून अनेक दिग्गज आले होते. उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. यावेळी घडलेल्या एका प्रसंगाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसहत सर्वांचे लक्ष्य वेधले.

झालं असं की पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार होते. वडिलांना खाली वाकून बूट घालण्यास त्रास होतोय… कष्ट घ्यावे लागत आहेत, त्यांना मदतीची गरज आहे, हे लगेचच सुप्रिया सुळे यांनी हेरलं आणि त्यांनी खाली बसून वडिलांच्या पायात बूट घातले.

आपल्या पदाचा, राजकीय वलयाचा कसलाही विचार मनी न बाळगता, सुप्रिया सुळे यांनी आपल्या बाबांना अर्थात शरद पवार यांना पायात बूट घालण्यासाठी त्या लगेचच पुढे सरसावल्या. यावेळी समोरच बसलेल्या नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.