“प्रिय बाबा, तुमच्या विचारांची…”; पवारांच्या वाढदिवसानिमित्त लेकीची Instagram पोस्ट चर्चेत

0
179
Supriya Sule Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात,” असे सुळेंनी म्हटले आहे.

खा. शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये केंद्रातील कृषीमंत्री पदापासून ते राज्यच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सुप्रिया सुळे यांनीही आपल्या वडिलांबरोबर काढलेला एक फोटो शेअर करत ‘प्रिय बाबा’ या शब्दांसहीत सुप्रिया यांनी खास पोस्ट लिहिली आहे.

https://www.instagram.com/p/CmDhgltjaiF/?utm_source=ig_web_copy_link

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहले आहे की, “तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,”