महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही; छापेमारी नंतर सुप्रियाताईंनी ठणकावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. तसेच पार्थ पवार यांच्या मुंबईतील ऑफिस वर ही छापा टाकण्यात आला . यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमची जॉइंट फॅमिली आहे. आमचं एक कुटुंब आहे. ते नुसते दादांचे नातेवाईक नसून आमचे एकत्र कुटुंब आहे. दिल्ल्लीने महाराष्ट्रावर कितीही अन्याय केला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्ली पुढे झुकणार नाही आणि झुकलाही नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सध्या देशात सूडाचे राजकारण सुरू आहे. सत्तेत असतानाही आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून पवार कुटुंबीयांना संघर्ष नवीन नसल्याचे त्या म्हणाल्या. आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. हीच आमची संस्कृती आहे, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Comment