व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सदाभाऊंची भाजपमध्ये अवस्था ही नटरंगासारखी ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काल जोरदार टीका केली. यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सदाभाऊंवर पलटवार केला असून “सदाभाऊ तुमची अवस्था ही केतकी चितळे सारखी नाही तर भाजपच्या नादाला लागून नटरंगमधल्या अतुल कुलकर्णी सारखी झाली आहे,” अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर त्याच्या टीकेला सूरज चव्हाण यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहे की, सदाभाऊ तुमची अवस्था ही केतकी चितळे सारखी नाही तर…भारतीय जनता पार्टी च्या नादाला लागून नटरंग मधल्या अतुल कुलकर्णी सारखी झालीय.. आता आम्ही एवढंच म्हणू शकतो गडी चांगला होता, असे म्हणत चव्हाण यांनी सदाभाऊंवर निशाणा साधला आहे.

फडणवीसांचे कौतुक करत काय केली होती सदाभाऊंनी टीका?

टेंभुर्णी येथे पार पडलेल्या भाजपच्या कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “दोन वर्षानंतर तुम्ही मास्क काढून बोलत आहात. त्याच्या बातम्याही आल्या. तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा होता काय? 13 कोटी जनता हे सहन करणार नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर केली आहार तर “मी शरद पवारांना शेतकऱ्यांचे जाणते राजे मुळीच म्हणणार नाही. ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा प्रपंच मातीत घालणारे लुटारू राजे आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस तुम्ही लवकर परत या आमची अवस्था हि केतकी चितळे सारखी झाली आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले आहे.