सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,
सुरेश खाडे हे निष्क्रीय आमदार आहेत. मिरज मतदारसंघातील रस्त्याच्या कामासंदर्भात अपयशी ठरल्यामुळेच सुरेश खाडे हे आपल्या कार्यकत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकावर टीका करीत आहेत. हिंम्मत असेल तर त्यांनी स्वतः आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे एकाच स्टेजवर येवून द्यावे असे जाहीर आवाहन मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे व सलगरेचे सरपंच तानाजी पाटील यांनी दिले.
तानाजी पाटील म्हणाले, मालगांव सलगरे रस्त्यासंदर्भात संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडेे विचारणा केलेनंतर आ .सुरेश खाडे व त्यांच्या कार्यकर्त्यांना राग का आला? त्यांचे व संबंधित विभागाचे साटेलोटे आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. मालगाव रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले हे वस्तुस्थिती आहे. त्याच्याकडे कानाडोळा करून केवळ व्यक्ती दोषापोटी टिका सुरू आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कोणत्याच विधानसभा मतदार संघात १६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला नाही.परंतु सुरेश खाडे खोटं बोल पण रेटून बोल अशा पध्दतीने बालतात. सुरेश खाडे यांनी एवढा निधी कोठून आणला जर १६०० कोटी निधी खर्च झाला आहे. तो गावनिहाय जाहीर करावा असे आव्हान त्यांनी दिले तर अनिल आमटवणे म्हणाले.
पंचायत समितीच्या गटनेतेपदी असल्यामुळेच आम्ही संपूर्ण तालुक्याच्या प्रश्नावर आवाज उठवीत असतों . आमच्या मतदार संघातील कामे पूर्ण करून पुर्व भागाकठे लक्ष देतो त्यामुळे भाग व विकास याची तुलना विरोधकांनी करू नये. मालगावचे भाजपाचे गट नेते प्रदिप सावंत यांना वर्षभरातच आ.खाडेंचा एवढा पुळका का आला हे सर्वांना माहीत आहे. मालगांव हद्दीतील कुष्ठ रोग्यांच्या जमीन प्रश्नी खाडेंच्या विरोधात भूमिका घेवून मालगांव बंद करून आंदोलनात अग्रभागी राहून विरोध केला. परंतू अचानक खाडेंच्या संस्थेस जागा मिळवून देण्यास त्यांनीच मदत केली. त्या मागचे गौड बंगाल काय हे संपूर्ण जनतेला माहीत असल्याचा टोला त्यांनी लगावला.