हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपमधील विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे सदस्य सुरेश प्रभू यांनी नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे त्यांनी राजकारणातून संन्यास घेत असून कोणतीही राजकीय निवडणूक लढवणार नाही. आता फक्त पर्यावरणासाठी काम करणार, असे म्हटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी जेव्हा रेल्वेमंत्री पदाची कामगिरी हि अत्यन्त चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात रेल्वे, वाणिज्य अशी दमदार खाती त्यांना देण्यात आली होती. सुरेश प्रभू यांच्याबाबत सांगायचे झाले तर ते पेशाने सनदी लेखापाल आहेत.
मूळचे शिवसेनेचे नेते असलेल्या सुरेश प्रभू यांना नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अगदी ऐन वेळी भाजपात सामावून घेण्यात आले होते. दिवंगत भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही प्रभू मंत्री होते. त्यावेळी नद्या जोड प्रकल्पासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळेच त्यांना मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.