हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र अजूनही म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत तर तिन्ही सामन्यात शून्यावर बाद होण्याचा लाजिरवाणा विक्रम त्याच्या नावावर जमा झालेला आहे. त्यामुळे संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्दच्या क्रिकेट मालिकेत सूर्यकुमार सलग तीनवेळा पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार बनला. पहिल्या 2 सामन्यात सूर्यकुमार मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पायचित झाला तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ऍश्टन अगरने त्याचा त्रिफळा उडवला. आगामी आयपीएल आणि विश्वचषक स्पर्धेपूर्वीच सूर्यकुमार यादवच्या या खराब फॉर्ममुळे भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मात्र सूर्यकुमार यादवची पाठराखण केली आहे. त्याने फक्त 3 च चेंडू खेळले हे दुर्दैवी आहे. ज्या चेंडूवर तो बाद झालं ते चेंडू चांगलेच होते, मात्र त्याने चुकीचे शॉट खेळले असं रोहित म्हणाला. हे कुणासोबतही होऊ शकते. कार्यक्षमता, गुणवत्ता नेहमीच असते. तो सध्या त्या टप्प्यातून जात आहे असे रोहितने म्हंटल.