नवी दिल्ली । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.
पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. दरम्यान, पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं. निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय महाराष्ट्राने नाकारला असल्याचंही सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं
दरम्यान, आपण कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिने स्पष्ट केलं आहे. बिहार सरकारने यात लक्ष घालण्यामागे आगामी निवडणूक हाच मुद्दा असल्याचा आरोप रियाने केला. शिवाय सुशांतच्या बहिणीकडून विचित्र शारीरिक वर्तन केलं गेल्याचा धक्कादायक खुलासाही तिने केला. सुशांत सिंगच्या कुटुंबियांची बाजू मांडणाऱ्या विकास सिंग यांनी मात्र रियाने बिहार सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर लावलेले आरोप बेजबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
#SushantSinghRajput death case: FIR registered at Patna was correct. The state of Maharashtra refused the option to challenge the order, says Supreme Court
— ANI (@ANI) August 19, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”