नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भात बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती. अखेर केंद्र सरकारने बिहार सरकारची शिफारस स्वीकारली आहे. केंद्र सरकारने सुशांत प्रकरणाच्या CBI चौकशीस मान्यता दिली आहे. गेल्या दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने बिहार सरकारची मागणी मान्य केली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.
#SushantSinghRajput: Vikas Singh, lawyer of Sushant Singh Rajput's father tells Supreme Court that quarantine (of Bihar IPS Officer Vinay Tiwari in Mumbai) is only to destroy the evidence. He also pleaded for a direction to Mumbai police to cooperate with Bihar police in the case
— ANI (@ANI) August 5, 2020
दरम्यान, सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापलं असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली. याशिवाय सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती. तर भाजपने सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित करत राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करत सीबीआय चौकशीचा राग आवळला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”