Breaking | भविष्यात काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार, सुशिलकुमार शिंदेंचे मोठे वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर प्रचारसभांना आता सगळीकडेच जोर येऊ लागला आहे. सोलापूर उत्तर ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतील काँग्रेसची जागा आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत ही जागा घटकपक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. एकमेकांना सहकार्य केलं तरच ते आघाडी धर्माचं पालन होईल असं म्हणत येत्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष ताकदीने उभे राहतील असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. सोलापूर शहर उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

दोन्हीही पक्ष आता थकले आहेत. त्यातील ज्येष्ठ मंडळींनी जेवढं काम करणं आवश्यक होतं तेवढं त्यांनी केलं आहे. आपण दोघंही एकाच झाडाखाली वाढलो आहोत त्यामुळे एकमेकांमधील कुरबुरी समजून घेऊन पुढं जाण्यात शहाणपण आहे असं शिंदे पुढे म्हणाले. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असूनही म्हणावं तसं यश मिळत नाही, तरुणांना आपण एकत्र करू शकलो नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपापसात भांडता कामा नये ही शरद पवारांची पण खंत आहेच पण ते बोलून दाखवत नाहीत असा निर्वाळाही सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी दिला.