हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “आमचं मूल्य मराठी माणसाचं हित महाराष्ट्राचा मान सन्मान जपणे आहे. हे मूल्याधिष्टीत राजकारण बाळासाहेबांनी शिवसैनिकांमध्ये रुजवलं, आता शिंदे साहेब आडनाव बदलून ठाकरे लावतील का? एकनाथ शिंदेंना आता ठाकरे आडनाव लावायची वेळ येईल का विचार करावं लागेल,” अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची वरळीतील जांभोरी मैदानावर पार पडत आहे. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीकेची तोफ डागली. यावेळी त्या म्हणाल्या की, वरळीतील या जाहीर सभेत सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेवर सडकून टीका केली. “मला वरळी नवीन नाही. माझं आणि वरळीशी माझं नवीन नात आहे. किती तरी नाव आहेत जी वरळीशी जोडलेली आहेत त्यांना मी जोडलेली आहे. मी विजयादशमीच्या मुहूर्तावर बोलत होते तेव्हा म्हटलं होतं इलाखा तुम्हारा धमाका हमारा स्टाईल है.”
विशेष म्हणजे चिन्ह आणि पक्ष गेलं तरी आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे, म्हणूनच या सभेला अशी प्रचंड गर्दी झाली असून हा आदित्योदय आहे. आम्ही आता महाराष्ट्रात फिरतोय, आम्ही लढतोय आणि जिंकणार म्हणजे जिंकणार,” असा विश्वासही अंधारे यांनी यावेळी केला.
ठाकरे गटाकडून ”शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गेल्यानंतर आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याआधी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.