अभिनेत्री सुष्मिता सेनचा Ex-Boyfriend रुग्णालयात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील अभिनेत्री सुष्मिता सेन हि तिच्या अभिनयामुळे अजूनही लोकांमध्ये कायम घर करून राहिली आहे. ती तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सुष्मिता आणि ललित मोदी दोघांचे रोमांटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिवाय ललित मोदी याने सुष्मिता हिच्यासोबत काही फोटो पोस्ट करत एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिली होती. परंतु त्याच्यातील नाते जास्त दिवस टिकले नाही. पण आता पुन्हा ललित मोदी प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे.

आयपीएल संस्थापक ललित मोदी रुग्णालयात दाखल झाला असल्यामुळे आता पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली आहे. ललित मोदी सध्या लंडन याठिकाणी उपचार घेत असून ललित मोदीला कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ललित मोदी कोरोनाची लक्षणं असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मोदी याने एक पोस्ट शेअर करत स्वतःच्या प्रकृतीबाबत सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CnWn55KNf-I/?utm_source=ig_web_copy_link

सध्या सोशल मीडियामध्ये ललित मोदीचा रुग्णालयातील फोटो व्हायरल होत असून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याने देखील कमेंट करत ललित मोदीच्या प्रकृतीची विचारपूस केली.

https://www.instagram.com/p/Cl6AM3HrOy7/?utm_source=ig_web_copy_link

सुष्मिता सेन कायम तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली. अनेकांसोबत सुष्मिता रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात आले. पण अभिनेत्रीचे कोणतेही नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. आजही अभिनेत्री एकटी आयुष्य जगत आहे. आणि ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे.

https://www.instagram.com/p/CXyOlR2v7QQ/?utm_source=ig_web_copy_link

सुष्मिता आणि ललित मोदी प्रेमकरण

ललित मोदी यांनी जुलै 2022 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सुष्मिता आणि त्यांच्या नात्याबद्दल जाहीर केले होते. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. सुष्मितासाठी ललित मोदी यांनी betterhalf असा उल्लेख केला होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. लग्न न करताही मातृत्व अनुभवता येते हे सुष्मिता सेनने दाखवून दिले आहे.