पुणे । कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या पुण्यात आज धक्कादायक घटना घडली. आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना, या भीतीने एका २४ वर्षीय रुग्णाने आज येथील एका रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.पुणे शहरातील बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात काल (१४ मे) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात आणण्यात आले होते. आज दुपारी तपासणीसाठी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. होते. स्वॅब घेतल्यानंतर तो तणावाखाली होता. सायंकाळी सातच्या सुमारास बाथरूमला जायचे आहे, असे सांगून तो बाहेर पडला आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”