हिंदुंच्या भावना दुखावणाऱ्या अधिकार्याचे उद्यापर्यंत निलंबन करा; आचार्य तुषार भोसले यांची बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तर महाराष्ट्रातल्या साक्री, जि.धुळे येथील भूमिअभिलेख अधिक्षक म.सी.गाडगे याने कार्यालय परिसरातील देवस्थान हटविण्याचा फतवा काढला आणि तेथील देवी-देवतांच्या प्रतिमांची रस्त्यावर फेकून विटंबना केली.हे धार्मिक तेढ निर्माण करणारे कृत्य आहे.या कृतीमुळे समग्र हिंदु समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत.म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सदरील अधिकार्याचे उद्या संध्याकाळपर्यंत निलंबन करुन त्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

साक्री येथे भूमी अभिलेख विभागात अधीक्षक पदी नुकतीच नाशिक येथील म.सी. गाडगे यांची नियुक्ती झाली.हे महोदय आठवड्यातून एकचं दिवस ऑफिसला येतात. त्याप्रमाणे हे महाशय बुधवारी कार्यालयात आले आणि कार्यालय परिसरातील महादेवाचे मंदिर काढून फेका अशी त्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केली त्या अधिकाऱ्यांनीही वरिष्ठांची सूचना म्हणून ते मंदिर काढायला सरवात केली.पण ही बातमी साक्रीतील काही भाजपा कार्यकर्त्यांना माहिती झाली त्यांनी तत्काळ अधीक्षकांच्या फतव्याला विरोध केला आणि पोलिस प्रशासन व तहसीलदार साक्री यांच्याकडे या संबंधी तक्रार केली आहे.आता पुढे काय होतं हे येत्या बुधवारी जेव्हा हे महोदय अधीक्षक कार्यालयात येतील तेव्हाच कळेल.पण यावर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य भोसले मात्र प्रचंड चिडले आहेत.

दरम्यान,या हिंदूद्रोही अधिकाऱ्यावर लवकर कारवाई केली नाही तर हिंदू समाज रस्त्यावर उतरेल असेही तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment