Saturday, February 4, 2023

दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द झाल्याचा संशय; फडणवीसांचा गंभीर आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. आरोग्य विभागात दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द झाल्याचा संशय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

सरकारमध्ये नक्की काय चाललंय समजत नाही. परीक्षा कधी घेतात, कधी रद्द करतात. याचं कुठलंही टाइमटेबल नाहीय. कुठलंही ताळतंत्र नाहीय. आणखीन दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे ज्या पद्धतीने प्रवेशपत्र देण्यात आलेत तो सुद्धा हलगर्जीपणा आहे. कोणाला उत्तर प्रदेशातील प्रवेशपत्र तर कुणाला वेगवेगळ्या ठिकाणची प्रवेशपत्र देण्यात आलीयत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एकप्रकारचा गोंधळ निर्माण झालाय,” असं फडणवीस म्हणालेत.

- Advertisement -

काही दलाल मार्केटमध्ये आलेले आहेत, या पदांसाठी त्यांच्यापासून 5 लाख, 10 लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, हे गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं. हे लोक नेमके आहेत कोण याची चौकशी केली पाहिजे, अस फडणवीसांनी म्हंटल. तसेच विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.