जालना । शेतकऱ्यांच्या संघर्षमय विरोधानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली. हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ऐतिहासिक विजय आहे.या कायद्यांच्या स्थगितीची घोषणा होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे गावातील मुख्य रस्त्याने रॅली काढून मारोती मंदिरासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.यावेळी शेतकऱ्यांनी “अमर रहे,अमर रहे, शहीद किसान अमर रहे”, “शेतकरी एकजुटीचा विजय असो”, “एकीचे बळ मिळते फळ” अश्या घोषणा दिल्या.
केंद्र सरकारने मागील वर्षी पाशवी बहुमताच्या जोरावर तीन कृषी कायदे संसदेत पारित केले होते.ते कायदे शेतकरी विरोधी असल्याने कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता.सुमारे एकरा महिन्यांपासून दिल्ली,हरियाणा,पंजाब सहउत्तर भारतातील अनेक राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर ठाण मांडून आंदोलन करत होते.देशभरातल्या शेतकर्यांसोबतच राज्यातीलही शेतकरी याबाबत वेळोवेळी शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर आले होते.त्याचाच परिनाम म्हणून आज या केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राधाकृष्ण मैंद,युवा नेते विष्णू नाझरकर,विध्यार्थी आघाडीचे गणेश गावडे, सचिव पांडुरंग गटकळ,मुबारक शेख,पांडुरंग बांगर,अंकुश तारख,बाबासाहेब दखणे,कानिफनाथ सावंत,शिवाजी शेवाळे,भारत उंडे,सचिन चोरमले,अजय गावडे, बंडू शिंगटे,अर्जुन शेडगे,माजी सरपंच विजय नाझरकर,रामेश्वर लहाने,राजेंद्र भागडे,अशोक राजपूत,चंद्रकांत खमीतकर,अरुण बांगर,गजानन मुळे,पंडित एसलोटे,अशोक जाधव,भगवान रेगुडे,सुनिल गायकवाड,पोपट खंडागळे,अरबाज काझी,गोरख कोल्हे,राजू उंडे,सतीश ढोणे, साळीकराम बाळसराफ आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.