पुणे : पुण्यातील बाणेर परिसरातून पाच ते सहा दिवसांपूर्वी चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण (swarnav chavan) या चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलीस कसून त्याचा शोध घेत होते. अखेर हा चिमुरडा आज सापडला. पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथे पोलिसांना तो सापडला.
मागील आठवड्यात बालेवाडीमधून चार वर्षांच्या स्वर्णमचे अपहरण केले गेले होते. त्यानंतर स्वर्णमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती, खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास ३०० ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे.
चतुरश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलिस शोधत आहेत. गेले आठ दिवस पोलीस सोसियल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.