अन आल्प्स पर्वतावर झळकला तिरंगा; भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला स्वित्झर्लंडचा अनोखा सलाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. सर्वच देशांकडून या महामारीला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं कौतुक जगभरात होत आहे. अशातच भारताने कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना असताना जगातील अनेक देशांना मदत देखील केली आहे. भारताच्या या कामाचं कौतुक जगभर होत आहे.

Matterhorn mountain in Swiss Alps lights up with Indian flag amid ...

कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईचं कौतुक होत असताना स्वित्झर्लंडने देखील भारताला अनोखा सलाम केला आहे. प्रसिध्द आल्प्स पर्वतरांगेतील मॅटरहॉर्न पर्वतावर भारतीय तिरंगा झळकवत सलाम केला आहे. भारतीय तिरंगा मॅटरहॉर्न पर्वतावर लाईट्सच्या मदतीने झळकवला आहे. यामधून कोरोनाविरोधाती भारताची लढाई आणि जिंकण्याच्या प्रयत्नांना सलाम केला आहे.

युरोपातील अनेक देशांतील नैसर्गिक सौंदर्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे ही आल्प्स पर्वतरांग. सुमारे 1200 किलोमीटर पसरलेल्या आल्प्स पर्वतरांगेला युरोपात अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडे जसं हिमालयाचं महत्व आहे तसंच युरोपात आल्प्सचं महत्व आहे. मॅटरहॉर्न हे 14690 फूट उंचीचं आल्प्समधील 6 व्या क्रमांकाचं गिरीशिखर आहे. माहितीनुसार या पर्वतावर मागील 24 मार्चपासून कोरोना महामारीनविरोधात जगातील देशांची एकजूट दर्शवण्यासाठी विविध देशांचे झेंडे झळकवण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

 

Leave a Comment