स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकावर तलवारीने खुनी हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील भारतनगर परिसरात कुख्यात गुंड दुर्लभ कश्यप नावाचा चौक उभा करणाऱ्या कश्यप गॅंगने रेणुकानगरमध्ये धुमाकूळ घालत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकाच्या डोक्यात फायटर आणि तलवारीने वार करत गंभीर जखमी केले. काहींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील केली. हा युवक खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये अत्यवस्थ असून त्याच्या डोक्याला तब्बल 70 टक्के पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पाचही आरोपींना पुंडलिक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शिवाजीनगर भागातील साइ नगर येथे शुभम विनायक मनगटे (24) हा युवक स्पर्धापरीक्षांची तयारी करतो. शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कश्यप गॅंगचे राजू पठाडे, यश पाखरे, शुभम मोरे, अतिष मोरे, शेख बादशाह शेख बाबा, निलेश धस, पिन्या खडके यांच्यासह इतर दोन अनोळखी मुलांनी शुभम याचा किराणा दुकान आणि घरासमोर येत बाहेरून लाथा बुक्या मारून दुकान उघडण्याची मागणी केली. तेव्हा घरात शुभमची आई- वडील आणि लहान भाऊ होता. त्यांनी दरवाजा उघडला नाही. शुभम एका लग्न होऊन घरी आल्यानंतर त्याचे समजले. आरोपी यश पाखरेला मावसभाऊ राजु पठाडे यांच्या मार्फत समजावून सांगावे यासाठी शुभम मित्रासोबत पठाडेच्या रेणुका नगर येथील घरी गेला. वरील सर्व हल्लेखोर तेथे आले. त्यांनी शुभमला शिवीगाळ केली. पाखरे याने शुभमच्या डोक्‍यात फायटरने वार केले.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दुर्लभ कश्यप हा कुख्यात गुंड आहे. त्याच्या नावाने पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत नगर येथे एक चौक बनवण्याची माहिती पुढे आली आहे. कश्यप हा कपाळावर लाल टिक्का, गळ्यात गमछा आणि अंगात काळा शर्ट घालून गुन्हेगारी कृत्य करीत होता. त्याचीच नक्कल यश पाखरे, शुभम मोरे यांच्या यांनी केली आहे.

Leave a Comment