टी.पी मुंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी। परळी विधानसभा जागेसाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विजयासाठी काटे कि टक्कर लढत ठरू पाहणाऱ्या या जागेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र मतदाना आधीच धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काँगेसचे प्रदेश सरचिटणीस टी. पी मुंडेनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने धनंजय मुंडे यांना ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामागचे दुसरे एक कारण म्हणजे, टी.पी मुंडे यांनी कॉग्रेसकडून परळी मतदार संघातून उमेदवारीचा दावा केला होता. मात्र, आघाडी कडून धनंजय मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने टी. पी मुंडे नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावून भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यानुसार टी.पी मुंडे यांनी परळी तालुका काँग्रेसचे विसर्जन करुन भाजपात प्रवेश करतं असल्याचे जाहीर केले आहे. टी.पी मुंडे यांच्या भाजप प्रवेशानंतर पंकजा मुंडेनी निवडणुकीत अगोदरच बाजी मारल्याचे बोलले जात आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत टी.पी मुंडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी २० हजार मत घेतली होती. सध्या स्थानिक नगरपालिका, बाजार समिती जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादी सोबत सत्तेत होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाने पंकजा यांना फायदाच होणार असून, परंतु धनंजय मुंडेसाठी मोठा धक्का समजला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Leave a Comment