एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर..; राणेंचे सूचक ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे गुजरात येथे जवळपास 25 आमदारांसोबत असून राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूचक ट्विट केलं आहे. शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता. अस … Read more

एकनाथ शिंदेंची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद; स्पष्ट करणार भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे 25 आमदारांसह गुजरात मध्ये आहेत. काल रात्री उशिरापासून शिंदे गुजरात येथील हॉटेल मध्ये आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजता सुरत येथून पत्रकार परिषद … Read more

एकनाथ शिंदेशी संपर्क झालाय; संजय राऊतांची मोठी माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे हेविवेट नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून सोमवारी संध्याकाळी पासून ते नॉट रीचेबल आहेत. सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या एकूण घडामोडींमुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेशी संपर्क झालाय अशी माहिती दिली आहे. शिवसेनेचे काही आमदार … Read more

एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री !! ठाण्यातील बॅनरमुळे चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त मुलुंडसह सर्व ठाण्यात पोस्टर्स, बॅनर्स झळकाविण्यात आले आहेत. या बॅनर्समध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे … Read more

विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच; एकनाथ शिंदेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात ‘सी-६०’ पोलिसांशी झालेल्या चकमकीत शनिवारी २६ नक्षलवादी ठार झाले. ही चकमक सुमारे चार तास सुरू होती. चकमकीत तीन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांचे कौतुक करत नक्षलवाद्यांना इशारा दिला आहे. … Read more

तूम्ही “सीएम मटेरियल” आहात त्यामुळे राज्यमंत्र्यांसारखे वागू नका ; मुनगंटीवारांची एकनाथ शिंदेंना कोपरखळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकनाथ शिंदे साहेब ‘तुम्ही सीएम मटेरियल आहात. त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका’ असं विधान मुनगंटीवार यांनी करताच आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, असं थेट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता सभागृहातच म्हटलं आहे.यामुळे आता खांदेपालट होऊ शकतो का ? असा प्रश्न देखील निर्माण होतोय. यवतमाळ … Read more

“बेस्टच्या ३५०० कर्मचाऱ्यांची सुमारे ४५० कोटी रुपयांची ग्रॅच्युइटी कधी देणार?”- आ.अतुल भातखळकर यांचा विधानसभेत प्रश्न.

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला बेस्ट उपक्रम मागील अनेक वर्षांपासून तोट्यात जात असताना सुद्धा विकासकांकडे असलेली सुमारे १६० कोटीं रुपयांची थकबाकी वसूल करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र बेस्टकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करत ३५०० बेस्ट कर्मचाऱ्यांची सुमारे ४५० कोटी रुपयांची ग्रॅच्युइटी मागील अनेक महिन्यांपासून द्यायची नाही अशी दुटप्पी भूमिका ठाकरे … Read more

मराठा आरक्षणाच्या साखळी ठिय्या आंदोलनाला गृहराज्यमंत्री देसाई यांची भेट; मांडली राज्य शासनाची भूमिका

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण येथे 14 दिवसांपासुन सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या राज्यव्यापी साखळी ठिय्या आंदोलनाला गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईं यांनी भेट दिली आहे. आंदोलकांच्या पुढे राज्यमंत्री म्हणून राज्य शासनाचे मराठा आरक्षणासंबधी काय प्रयत्न सुरु आहेत तसेच मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाची भूमिका काय आहे याबाबत देसाई यांनी आंदोलकांशी चर्चा केली आहे. मराठा समाजाला आरक्षण … Read more

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात ; वाशी टोल नाक्याजवळ झाला अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे. गुरुवारी 24 डिसेंबरला वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना गाडीला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याला थोडीफार दुखापत झालंचं समजतंय. अंगठ्याची दुखापत वगळता शिंदे यांच्या प्रकृती उत्तम आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात … Read more

राजकारणात कोणी कोणाला भेटावे यावर बंदी नाही,खडसेंच्या भेटीबाबत शिंदेंचे सूचक विधान

‘राजकारणात कोणीही कोणालाही भेटु शकतो. कोणी कोणाला भेटावे, यावर बंदी नाही’ असे विधान राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे महापालिकेमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे आले होते. राज्यात भाजपामधील नाराज नेत्यांचे भेटीगाठीतून भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत.