मार्च संपत आला तरी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार रखडले; जीएसटीची रक्कम २४ कोटींच्या घरात

औरंगाबाद | मार्च महिना संपत आला तरी राज्य सरकारकडून महापालिकेला जीएसटीची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. जीएसटीची रक्कम मिळावी, यासाठी पालिकेकडून सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. राज्य सरकारकडून महापालिकेला दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जीएसटीची रक्कम दिली जाते. सरकारकडून मिळणारी ही रक्कम २४ कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी सुमारे २१ कोटी रुपये … Read more

बोगस कागदत्रे सादर करून मिळवला जामीन, वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद |  जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करून जालना जिल्ह्यातील जामिनदाराने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी लाला चव्हाण (रा. खांबेवाडी, ता. जि. जालना) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी शिवाजी चव्हाण याच्याविरुद्ध गेल्या वषीर्पासून खटला सुरू आहे. या खटल्यातून जामीन मिळविण्यासाठी … Read more

विभागीय क्रीडा संकूल, देवगिरीत जम्बो कोवीड सेंटर; महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासण्या

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे मागील १५ दिवसांमध्ये सुरू केलेले सर्व कोवीड सेंटर हाउसफुल्ल झाले आहेत. शहरात ९ हजारांपेक्षा अधिक सक्रि य रूग्ण आहेत. नवीन रूग्णांसाठी विभागीय क्रीडा संकुल आणि देवगिरी बॉईज होस्टेलमध्ये कोवीड सेंटर उभारण्याची प्रक्रि या मनपाने सुरू केली आहे. महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासणी … Read more

… आता रूग्णालयातील बेडची उपलब्धता लगेच कळणार

औरंगाबाद | कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना सूचना केल्या आहेत. तर रूग्णालयात बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी दोन अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मोबाईलवर संपर्क साधून अवघ्या काही मिनिटांतच बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती मिळणार आहे. शहरी भागात … Read more

विष देऊन दोन डुकरांची हत्या

औरंगाबाद | उस्मानपुरा भागातील छोटा मुरलीधरनगर येथील रहिवासी विकास सुभेसिंग लाहोट यांच्या दोन पाळीव डुकरांना दि.१५ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ च्या दरम्यान विष देऊन मारण्यात आले. याबाबत वेदांतनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे. विकास सुभेसिंग लाहोट हे वराह पालन करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यांची दोन पाळलेली डुकरे होती. दि. १५ मार्च … Read more

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 26 मार्च रोजी कोरोना काळात उत्पन्नाचा स्रोत खालावला

औरंगाबाद |  जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 26 मार्चला सादर होणार असून कोरोना काळात उत्पन्नाचा स्रोत आणि अनुदानावर झालेल्या परिणामाचा फटका यावर्षी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. 2020 आणि 2021 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शुक्रवारी 26 मार्च रोजी होणार आहे. या सभेत 2021 आणि 2022 चा अर्थसंकल्प सादर होणार असल्याची माहिती … Read more

कोट्यवधींची फसवणूक करणारी, आंतरराज्य टोळी पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद | बँकेमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुण्याच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात परमजितसिंग संधू (४२, रा. औरंगाबाद) व राजेश मुन्नालाल शर्मा (४२, रा. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर … Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, २१ मार्चला मतदान; २२ रोजी मतमोजणी

औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २१ मार्चला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपासून अदालत रोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली. शेतकी मतदारसंघाच्या औरंगाबाद तालुक्याचे व प्रोसेसिंग मतदारसंघाचे मतदान क्रांती चौकातील विभागीय … Read more

पहिल्या दिवशी ५३ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा चार जिल्ह्यांत ३१६ केंद्रांवर व्यवस्था

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित पदवी अभ्यासक्र माच्या व्दितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांना १६ मार्चपासून सुरूवात झाली. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत सुमारे ५३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा दिली. परंपरागत पदवी अभ्यासक्र माच्या व्दितीय तसेच तृतीय वर्षाच्या परीक्षा पहिल्या दिवशी सुरळीत पार पडल्या. ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी … Read more

५ हजारांची लाच घेताना दोन हवालदार एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद | न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करण्यासाठी व गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांना रंगेहाथ अटक केली आहे. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पोलीस हवालदार शेख अफसर शेख इलोमोद्दीन (वय ५२), रत्नाकर पुंडलिक बोर्डे (वय ५0) या दोघांनी गुन्ह्याच्या तपासकामी ५ हजार रूपयांची मागणी … Read more