जाधववाडीत भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी; प्रशासनाच्या आदेशाचे तीन-तेरा

jadhav vadi

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचं संक्रमण जोरात वाढत असताना नागरिकांचा गाफीलपणा चव्हाट्यावर येत आहे. जिल्हा प्रशासनाने आठवडाभर जाधव मंडई बंद ठेवली होती, आठवड्याभरानंतर आज ही भाजी मंडई सुरू झाली मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे नागरिकांच्या बेजबाबदारपणातून तीन-तेरा वाजले असल्याचे दिसून आले आहेत. शहरातील जाधवमंडईत आज सकाळपासूनच कधी न बघितलेला भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली … Read more

घाटीतील डॉक्टर, कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा ; आरपीआयकडून पोलिसात तक्रार

ghati hospital

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात समोर उपचाराअभावी तडफडून मृत्यू झालेल्या प्रकरणात उपस्थित असलेले डॉक्टर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी तक्रार आरपीआयच्या वतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. 16 मार्च रोजी घाटी रुग्णालयातील अपघात विभागात समोर एक अनोळखी व्यक्तीच्या पायाला जखम झाली होती तो रुग्ण सुमारे दोन तास अपघात विभागासमोर वेदनेने … Read more

हॉटेल चालकांचे मोडले कंबरडे; पहिल्याच दिवशी फक्त 25 टक्के ग्राहक

hotel

औरंगाबाद : औरंगाबाद येथे कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 17 मार्च पासून हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बसून जेवणास बंदी घालत फक्त पार्सलची सुविधा ठेवली. त्याचा मोठा फटका या व्यवसायिकास बसला आहे. इतर वेळी ओसंडून वाहणाऱ्या नामांकित हॉटेल भोजनालयामध्ये पहिल्या दिवशी जेमतेम पंचवीस टक्के ग्राहकांनी पार्सल नेले. पार्सलची मागणी कमी असल्याने रस्त्यावर विक्री … Read more

धक्कादायक: औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट; दिवसभरात वाढले 1335 रुग्ण

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 442 जणांना (मनपा 357, ग्रामीण 85) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 52515 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61435 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1368 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7552 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या … Read more

विष देऊन दोन डुकरांची हत्या

औरंगाबाद | उस्मानपुरा भागातील छोटा मुरलीधरनगर येथील रहिवासी विकास सुभेसिंग लाहोट यांच्या दोन पाळीव डुकरांना दि.१५ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ च्या दरम्यान विष देऊन मारण्यात आले. याबाबत वेदांतनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे. विकास सुभेसिंग लाहोट हे वराह पालन करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यांची दोन पाळलेली डुकरे होती. दि. १५ मार्च … Read more

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 26 मार्च रोजी कोरोना काळात उत्पन्नाचा स्रोत खालावला

औरंगाबाद |  जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 26 मार्चला सादर होणार असून कोरोना काळात उत्पन्नाचा स्रोत आणि अनुदानावर झालेल्या परिणामाचा फटका यावर्षी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. 2020 आणि 2021 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शुक्रवारी 26 मार्च रोजी होणार आहे. या सभेत 2021 आणि 2022 चा अर्थसंकल्प सादर होणार असल्याची माहिती … Read more

कोट्यवधींची फसवणूक करणारी, आंतरराज्य टोळी पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद | बँकेमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुण्याच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात परमजितसिंग संधू (४२, रा. औरंगाबाद) व राजेश मुन्नालाल शर्मा (४२, रा. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर … Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, २१ मार्चला मतदान; २२ रोजी मतमोजणी

औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २१ मार्चला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपासून अदालत रोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली. शेतकी मतदारसंघाच्या औरंगाबाद तालुक्याचे व प्रोसेसिंग मतदारसंघाचे मतदान क्रांती चौकातील विभागीय … Read more

पहिल्या दिवशी ५३ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा चार जिल्ह्यांत ३१६ केंद्रांवर व्यवस्था

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित पदवी अभ्यासक्र माच्या व्दितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांना १६ मार्चपासून सुरूवात झाली. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत सुमारे ५३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा दिली. परंपरागत पदवी अभ्यासक्र माच्या व्दितीय तसेच तृतीय वर्षाच्या परीक्षा पहिल्या दिवशी सुरळीत पार पडल्या. ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी … Read more

५ हजारांची लाच घेताना दोन हवालदार एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद | न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करण्यासाठी व गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांना रंगेहाथ अटक केली आहे. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पोलीस हवालदार शेख अफसर शेख इलोमोद्दीन (वय ५२), रत्नाकर पुंडलिक बोर्डे (वय ५0) या दोघांनी गुन्ह्याच्या तपासकामी ५ हजार रूपयांची मागणी … Read more