‘शंभरी’ पार केलेल्या आजीने बजावला तिसऱ्या पिढी सोबत मतदानाचा हक्क

नाशिकच्या गवळाने गावात राहणाऱ्या १०२ वर्षांच्या सखुबाई नामदेव चुंबळे मात्र प्रत्येक निवडणुकीत आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन जात मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या तीन पिढ्यांना बरोबर नेत आज देखील मतदान केलं. आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या करून दिला.

मतदारांनो ‘या’ मुलीचा आदर्श घ्या…!

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सुट्टी असल्याने अनेक जण मतदान करण्याऐवजी घरीच आराम करण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याच बेत आखतात. मात्र मतदान आपलं कर्तव्य आहे, याचा अनेकांना विसर पडतो. मात्र समाजात अशीही काही मंडळी आहेत, ज्यांना कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. दिंडोरी विधानसभा निवडणुकीत पेठ शहरातील खातून मुस्ताक शेख ही दोन्हीही पायानं अपंग आहे. तरीही या मुलीनं आज मतदानाचा आपला हक्क बजावला.

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा. यासाठी मालेगाव येथील नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करुन लोकांना मतदान करण्याच आवाहन केले. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराने केला राष्ट्रवादीत प्रवेश

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकांमध्ये सध्या युतीकडे इनकमिंग चालू आहे. अशातच सिन्नरचे माजी आमदार कोकाटे यांनी आपली शरद पवारांवर असलेली निष्ठा सिध्द करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सरकार द्वेषाच्या भावनेने गुन्हे दाखल करत असून, जनतेला अशा प्रकारचे राजकारण अभिप्रेत नसल्याचे वक्तव्य कोकाटे … Read more

एटीएम फोडून पसार होण्याचा चोरट्यांचा ‘प्लॅन’ फसला

नाशिक प्रतिनिधी। शहरातील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा काल प्रयत्न करण्यात आला, परंतु पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडीचा प्लॅन फसला. पोलिसांनी तत्काळ आपली सूत्र हलवत सदर एटीएम फोडी प्रकरणातील २ आरोपी सध्या पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. या बाबत सविस्तर वृत्त असे की, खोडे पार्क परिसर,स्टेटस हॉटेल च्या मागील बाजुस असलेल्या त्र्यंबक रोड वरील परिसरामध्ये … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक मध्ये

नाशिक प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मोदी आणि फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत होत असलेल्या या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. … Read more

नाशिक कारागृहातील कैद्याने जोपासली अनोखी कला

नाशिक प्रतिनिधी । एखादी लहान चूक आयुष्यात आपल्या हातून नकळत घडते..आणि तोच गुन्हा ठरून आयुष्यभर शिक्षा भोगावी लागते. लहान मोठ्या चुका झाल्याने कैदीच्या रूपात अनेकांचे आयुष्य अंधार कोठडीत वाया गेले. मात्र चार भिंतींच्या आड कारागृहात हे कैदी काय करतात. त्यांच्या आवडी-निवडी ते कशा जोपासतात या कैद्यांमधे लपलेल्या कलाकाराचा आविष्कार याच काळकोठडीत बघायला मिळतो. काळकोठडीत शिक्षा … Read more

सात वर्षांच्या मुलीने गिळले १ रुपयाचे नाणे ; पुढे झाले असे काही

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |भिकन शेख सातवर्षीय मुलीच्या श्वसनलिकेत अडकलेले एक रुपयाचे नाणे शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर संजय गांगुर्डे यांनी ही शस्त्रक्रिया केली. रिया देवरे, असे या मुलीचे नाव आहे. रियाने (हनुमान चौक, सिडको) गुरुवारी संध्याकाळी खेळत असताना एक रुपयाचे नाणे गिळले होते. ते नाणे तिच्या घशात अडकले. यामुळे तिला गिळायला आणि श्वास घ्यायला … Read more

आश्चर्य !चक्क डान्स करत चोरांनी केली ३ लाखांची चोरी ; चोरांचा डान्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख ,  नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरांचा धुमाकूळ. आज येवल्यात चोरट्यानी रात्री पैठणीच्या कारखान्यातुन 3 लाख रुपयांच्या पैठणी नेल्या चोरून, विशेष म्हणजे चोरी करतांना चोरट्यांनी डान्स ही केला. सध्या नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरांनी धुमाकूळ घातला असून चांदवड व मालेगावात घडलेल्या चोरीच्या घटना ताज्या असतांना रात्री 3 जणांच्या टोळीने येवल्यात नाकोडा … Read more

नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख,  एप्रिल महिन्याच्या अखेरीस नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. धरणातील पाणी साठा कमी होऊ लागलंय तर विहिरींनी अक्षरशा तळ गाठलाय. याच विहिरीतून जीवघेणी कसरत करत महिलाना पाणी भाराव लागतंय. श्वास रोखून धरणारी ही दृश्य तुमच्या काळजाचा ठोका निश्चितच चुकावातील.. थरकाप उडविणारी ही दृश आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्म्बकेश्वर तालुक्यातील … Read more