लॉकडाउनमध्ये नाशिक दौरा केल्यानं अक्षय कुमार अडचणीत? भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक । बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार २ दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ … Read more

वारीतील मानाच्या सात पालख्यांबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव सोहळा म्हणून पंढरीची वारी जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टाळ मृदूंगाच्या तालावर संतांच्या पालख्यांसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक  पंढरपूरला पायी जातात. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे पंढरीची ही पायी वारी होणार नाही आहे. सरकारने कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे … Read more

आम्ही ठाकरे सरकारच्या सोबत; अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यात आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्र गेल्या २ दिवसांपासून निसर्ग चक्रीवादळाच्या भीतीच्या छायेखाली आहे. आता हे वादळ महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकत आहे. महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे नुकसान होते आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ट्विट केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव … Read more

नाशिक शहरातील मद्य विक्रीची दुकाने बंदच; आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द

नाशिक प्रतिनिधी । सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस शासनाने परिपत्रकाद्वारे 3 मे 2020 रोजी परवानगी दिली. नाशिक शहर रेड झोनमध्ये असूनही मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात आली. परंतु बऱ्याच मद्य विक्री दुकानांवर सुरक्षित वावराच्या नियमांना पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांना मनुष्यबळाचा … Read more

नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅबला ‘एम्स’ ची मंजुरी

नाशिक प्रतिनिधी । नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅबला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने आज मंजुरी दिली आहे.  सध्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हा परिसर सध्या हॉटस्पॉट बनल्याने ह्या लॅबचा उपयोग फार महत्व पूर्ण असणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी होत असतांना नाशिक जिल्ह्यातील संख्या मात्र ही वाढत जात असल्यामुळे चिंतेची बाब ठरत होती. मात्र एम्सच्या … Read more

कौतुकास्पद! ‘या’ अवलिया शेतकर्‍याने स्वत:च्या शेतातील गहू भुकेलेल्यांना मोफत वाटले

नाशिक प्रतिनिधी | कोरोनाने ग्रामिण भागातही आता पाय पसरलेत. सातासमुद्रापार सुरु झालेल्या या राक्षसी आजारानं आता गावोगावी भिती पसरवलीये. देशात लाॅकडाऊन असल्यानं सर्व छोटे मोठे व्यावसाय, उद्याग बंद आहेत. अशाने तळ हातावर पोट असणार्‍यांवर खूपच बिकट परिस्थिती आलीय. ग्रामिण भागात मोलमजूरी करुन घर चालवणार्‍या कुटूंबांवर उपासमारीची वेळ आलिये. कोणीच शेतावर कामाला बोलावत नसल्याने मजूरी, भांगलणी … Read more

कोरोना महाराष्ट्रात दाखल? नाशिकमध्ये आढळला संशयित रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली, तेलंगणमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आता महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिल आहे. या व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली असून त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटलं … Read more

त्र्यंबकेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्साहात साजरी

नाशिक प्रतिनिधी । आज शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात आली. पालखी मेनरोडमार्गे लक्ष्मीनारायण चौक, पाच आळीतून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या दारासमोरून येऊन पालखीचे औक्षण स्वीकारले. कुशावर्तावर स्नानपूजा, आरती होऊन नेहमीच्या परतीच्या पारंपरिक मार्गाने पालखी पुन्हा मंदिरात आणली गेली. या पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सामील झाले होते. महाशिवरात्रीनिमित्त केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे त्र्यंबकेश्वर … Read more

हेच कर्मवीर अण्णांचे स्वप्न, रयत शिक्षण संस्थेत राज्याबाहेरील मुलेदेखील – शरद पवार

नाशिक प्रतिनिधी | आज रयत शिक्षण संस्थेत राज्यातीलच नाही तर राज्याबाहेरील मुलेदेखील शिक्षण घेत आहेत. यातून समाजात ही पिढी आत्मविश्वासाने उभी राहते आहे. हेच कर्मवीर अण्णांचे स्वप्न होते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेविषयी गौरवद्गार काढले. संस्थेच्या विंचुर,ता. निफाड,जि. नाशिक येथील नूतन शालेय इमारतीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. … Read more

मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

नाशिक । मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांनी केले आहे. नाशिक येथे खानदेश महोत्सवाच्या समारोपावेळी ते बोलत होते. फडणवीस यांच्या सदर विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. आपण सर्व जण भटके झालो आहोत. नोकरी व्यवसायानिमित्त आपण आपले मूळ गाव सोडून शहरात वास्तव्यास आहेत. मात्र आपल्या … Read more