ठाण्यातील १८ विधानसभा मतदार संघातील ९०० कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा?

वारंवार सुचना, पत्रव्यवहार करुनही विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणार्‍या ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातील तब्बल ९०० कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रथम प्रशिक्षण वर्गास हजर राहून दुसऱ्या प्रशिक्षणवर्गास गैरहजर राहणाऱ्या सदर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरु झाली आहे.

शरद पवार राजकारणातील सोंगाड्या, उध्दव ठाकरेंचा पवारांवर घणाघात

शरद पवारांची राष्ट्रवादी आता भ्रष्टवादी झाली असून शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या आहेत. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज करमाळा येथे जाहीर सभेत बोलताना केली.

५ वर्षात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे – नितीन गडकरी

गेल्या ५ वर्षात भाजप सरकारच्या काळात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिचर अजून बाकी आहे’ असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारात विश्वास व्यक्त केला. गडकरी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभेत भाजप उमेदवार कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘पोस्टल मतदान’ प्रक्रिया सुरू

विधानसभेसाठी कोल्हापुरातील शासकीय कर्मचारी, पोलीस,होमगार्ड,सुरक्षारक्षक यांच्या मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. कोल्हापूरातील दहाही मतदान केंद्रासाठी हे मतदान झाले. सकाळी ११ ते ५ ही या मतदानाची वेळ होती. बॅलेट पेपरवर हे मतदान घेण्यात आले असून पोस्टल मते म्हणून ते नोंदवण्यात आले आहेत.

३७० पेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल? हा खरा प्रश्न आहे – शरद पवार

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. दरम्यान कन्नड येथील सभेत उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या निवडणूक प्रचारातील ३७० च्या मुद्द्यावर टीका केली. देशात कलम ३७० पेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे. असे सांगत पवार यांनी आपले मत जाहीर सभेत प्रकट केले.

पालघर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार, ५० कार्यकर्त्यांनी ठोकला पक्षाला रामराम

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सेना युती होणार की नाही या संदर्भात अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता, पण अखेर युती झाली. पुढे तिकीट वाटपातही आयारामांना झुकत माप देत निष्ठावंताना डावलण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या त्यामुळे शिवसैनिक चांगलेच नाराज झाले आहेत. याच नाराजीतून मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना डहाणू तालुक्यात ५० प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आहे. तेव्हा ऐन मतदानापूर्वी कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे शिवेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे.

सोलापूर जिल्ह्यात ‘त्या’ चार गावांचा मतदानावर बहिष्कार

मोहोळ विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील तारापूर, वीटे, पोहरगाव, खरसोळी या चार गावांना आज ही पक्का डांबरी रस्ता नाही. त्यामुळं या चार गावातील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात सदर चारही गावातील सरपंचानी एकत्रित येत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. येथील गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोर जाव लागत आहे.

१५ वर्षात पवारांनी महाराष्ट्राला काय दिले? – अमित शहा

‘पंधरा वर्षात केंद्रात आणि राज्यात ‘आघाडी’ची सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्राला काय दिले?’ असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना कोल्हापूरातील सभेत विचारला आहे. ”चार लाख करोड रुपयांची मदत केवळ पाच वर्षात भाजप सरकारने महाराष्ट्रला दिल्या”चे त्यांनी यावेळी नमूद केलं.

निवडणूक फक्त आठ दिवसांवर, उमेदवारांच्या पायांना भिंगरी!

आठ दिवसांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक, गतिमान प्रचार यंत्रणा आणि उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून वाड्या वस्तीवर राबवलेला प्रचार, हे सर्व चित्र सध्या संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवर पाहायला मिळत आहे. जोरदार प्रचार, जोडण्या, वाटाघाटी, फोडाफोडी जोडाजोडी अशा घटना ग्रामीण भागात गतिमान होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या रात्री जागु लागल्या आहेत. त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी आता ‘रात्रीस खेळ चाले..’ ही राजकीय जोडण्यांची मालिका पुढील आठ दिवस सुरू राहील.

‘मतदान करा, भरघोस सूट मिळवा’ !! त्वरा करा!

मतदारांनी मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून लढवल्या जातात. नागपूर प्रशासनान विधानसभेसाठी असाच एक अभिनव उपक्रम केला आहे. मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या परिक्षेत्रातील रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये भरघोष सूट मिळवा. अशी युक्ती लढवली आहे.