महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड; शिवतीर्थावर घेणार शपथ

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड झाली. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी एक डिसेंबर रोजी शिवतीर्थ … Read more

सुप्रीम कोर्ट निकाल । महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणीचे आदेश; गुप्त मतदान नको

दिल्ली प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान करणारी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तापेच सोडविण्यासाठी उद्याच बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. यामुळे फडणवीस सरकार यांची उद्या अग्निपरीक्षाच असेल असे म्हणावे लागेल. या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेत उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी … Read more

‘चिंता नको मी राष्ट्रवादीतच’ म्हणणार्‍या अजित पवारांना शरद पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपसोबत हातमिळवणी करुन सरकार स्थापन केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत तो अजित पवारांचा वयैक्तिक निर्णय असलंयाचं सांगत राष्ट्रवादीची भुमिका स्पष्ट केली. I am in the NCP and shall always be in the NCP and @PawarSpeaks Saheb is … Read more

लाज वाटावी असं राजकारण!

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून या निर्णयांवर उलटसुलट चर्चा सुरु आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी लाज वाटावी असे राजकारण … Read more

प्रेमी युगुल मेट्रोत करत होते ‘असं’ काही, ते पाहून महिलेला अनावर झाला संताप

दिल्ली | देशाची राजधानी दिल्लीच्या मेट्रोमध्ये प्रवास करणार्‍या प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ अनेकदा आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले आहेत. अशाच एका प्रेमळ जोडप्याचा नवीन व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर घबराट पसरली आहे. परंतु प्रत्येक वेळीप्रमाणे हा व्हायरल व्हिडिओ लिप-लॉकचा नसून यावेळी एका जोडप्याच्या चाळ्यांमुळे एक … Read more

राज्यपाल गयारामच, महाराष्ट्र चालवणं म्हणजे पोरखेळ नाही – उद्धव ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल

राज्यात घडत असलेल्या घडामोडींचा धावता आढावा घेत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. भाजपला सत्तास्थापनेसाठी दिलेल्या वेळेतच शिवसेनेला बसवण्यात आलं. भाजपने असमर्थता दर्शवण्यासाठी वेळ घेतला असल्याची टीका करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आम्ही सोमवारी पहिल्यांदाच अधिकृत चर्चा केली आहे. काँग्रेसने हे स्वतःहून सांगितल्यामुळे भाजपच्या आरोपांना आता उत्तर मिळालं असल्याचं ठाकरे पुढे म्हणाले.

राष्ट्रपती राजवटीने आम्हाला निवांत केलं, आता बघतो काय करायचं ते – शरद पवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसची रंगतदार बॅटिंग पहायला मिळाली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेससोबत असलेल्या आपल्या भूमिकांची माहिती देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अधिकृतरित्या मागितलेल्या पाठिंब्याची माहिती दिली. यावेळी पाठिंबा द्यायचा तर सांगोपांग चर्चा गरजेचं असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आज चर्चा केल्याचं पटेल पुढं म्हणाले. काँग्रेसचे नेते वेणूगोपाल यांनी राष्ट्रपती राजवटीचा … Read more

गिरीश महाजनांच्या शुभेच्छांमुळे अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या वाटेवर..!!

Ajit Pawar set to become CM. Maharashtra Governor called NCP to form the government in maharashtra.

शिवसेनेला आमच्याशी चर्चा नकोच होती; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ४ वाजण्याच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोषयारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला. महाराष्ट्राच्या जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. सोबत काम केलेल्या मंत्रिमंडळाचेही त्यांनी आभार मानले. शिवसेना सोबत होती असं तुम्हाला वाटलं तर त्यांचंही आभार अशी कोपरखळी फडणवीसांनी यावेळी लगावली. यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करणंही फडणवीसांनी टाळलं.

राज्यात पुढील ४८ तासांत ‘मुसळधार पाऊस’; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. राज्यात २७ ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.