आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारने पंढरपूरला रवाना

मुंबई । आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय पुजेसाठी पंढरपुरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री, पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कारने मुंबईहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशीनिमित्ताने वारी रद्द करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रूक्मिणी यांची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे … Read more

राज्यात सरकारी कामांसाठी मराठी भाषा वापरा, अन्यथा पगार वाढ होणार नाही 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आल्यापासून पुन्हा एकदा मराठीचा ध्यास सुरु झाला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे मराठीचा वापर करण्यास सांगितले आहे. हा विभाग खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे त्यामुळे मराठी माणूस या विचारधारेचा प्रसार करणारी शिवसेना यापाठीमागे आहे असे म्हंटले जात आहे. राज्य सरकारच्या या सर्क्युलर मध्ये सर्व सरकारी कार्यालये, … Read more

अनलॉक-२ म्हणजे काय? याचा सुस्पष्ट खुलासा करा! फडणवीसांची ठाकरे सरकारला विचारणा

मुंबई । महाराष्ट्र सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढणार असल्याची घोषणा केली. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन अनलॉक २ म्हणजे काय याचा सुस्पष्ट खुलासा करावा अशी मागणी राज्य सरकारला केली आहे. गेल्याच महिन्यात उद्धव ठाकरे यांनी अनलॉक १ ची घोषणा केली होती. त्यानंतर लॉकडाउन हा शब्द आपण मागे ठेवून आता अनलॉक २ … Read more

‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्यात ‘हे’ नियम पाळणे बंधनकारक

मुंबई । ठाकरे सरकारने राज्यात लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची होणार वाढ आणि संसर्ग यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करणार नसल्याचं म्हटलं … Read more

आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाने जसा कारभार केला तसाच कारभार ठाकरे सरकार करतेय – स्मृती इराणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीचे आयोजन केले होते. विविध ठिकाणांहून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांनी काँग्रेस आणीबाणी काळात जसा कारभार करत होता, तसाच कारभार ठाकरे सरकार सध्या महाराष्ट्रात करत आहे असे विधान करत ठाकरे सरकारवर … Read more

राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर? देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सतत सरकारचा पाठपुरावा करताना दिसत आहेत. पर्यायाने सरकारवर आरोपांचे सत्र ही सुरूच आहे. त्यांनी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. ‘मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची हाताबाहेर जात असलेली स्थिती, ऑक्सिजनअभावी रूग्णांचे मृत्यू आणि … Read more

मुख्यमंत्री मातोश्रीला का राहतात? कोरोना संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘कोरोनाच्या संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात?’ असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.  यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरेंनी जो काही राग आहे, तो आमच्यावर काढावा. … Read more

एकाच वर्षात राम मंदिराचा निकाल, मुख्यमंत्रीपद ही शिवनेरीच्या मातीची कमाल आहे- उद्धव ठाकरे

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. शिवनेरीच्या मातीचीही कमाल असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी … Read more

भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणार – उद्धव ठाकरे

मुंबई । आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. भविष्यातील देशाचा पंतप्रधान शिवसैनिक असेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फेरंसिंगमध्ये शिवसैनिकांना आज मार्गदर्शन केले. यावेळी आपली वाटचाल योग्य दिशेने सुरु असून एक दिवस या … Read more

उद्धवजी आम्ही तुमच्याकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

मुंबई । उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, … Read more