उद्धव ठाकरेंना अयोध्येला जायला निमंत्रणाचा गरज नाही; संजय राऊतांचा भाजपाला टोला

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी निवडक १०० मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नसल्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांना छेडले असता, ” … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?

मुंबई| ठाकरे सरकारची तुलना मुघल राजाशी केल्याने एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीत ठक्कर या मुंबईतील एका यूजर ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. १ जुलै रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून … Read more

राज्यात कोरोना मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष, सामूहिक प्रयत्नांची गरज- मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष, सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जालना जिल्ह्यातील कोव्हीड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-पद्धतीने उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more

अनिल कपूरकडून ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे कौतुक; म्हणाला…

मुंबई | भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आतापर्यंत, कोरोना संक्रमित लोकांची एकूण संख्या 7,19,665 वर पोहोचली आहे. त्यापैकी 2,59,557 सक्रिय प्रकरणे आहेत तर 4,39,948 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, या धोकादायक विषाणूमुळे 20,160 लोक मरण पावले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत कोरोनासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अभिनेता अनिल … Read more

पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांची अखेर ‘घरवापसी’

मुंबई । महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दरी वाढवण्यास कारणीभूत ठरलेले पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. पारनेर नगर पंचायतीचे राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ५ नगरसेवक पुन्हा एकदा शिवसेनेत परतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते आज स्वगृही परतले. या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव … Read more

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही- मुख्यमंत्री

मुंबई । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी राजगृहाच्या काचांवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली होती. या अनुचित घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून पोलीसदेखील याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत, तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय- शरद पवार

पुणे । महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता, नाराजी वगैरे काहीही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे’, असे नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले. शरद पवार यांची आज पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी … Read more

कोरोना काळात फडणवीस दौरे करतायत तर उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडत नाही- चंद्रकांत पाटील

पुणे । कोरोना संकटात राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. … Read more