खासदारांचे जेवण महागणार; संसदेमधील कॅन्टीनची सबसिडी काढली

नवी दिल्ली | देशात सर्वात स्वस्त कॅन्टीन म्हणून संसदेमध्ये असलेल्या कॅन्टीन प्रसिद्ध आहेत. कॅन्टीनमध्ये खूप कमी किमतीमध्ये चांगले जेवण मिळत असते. पण आता जेवणावर असलेली सबसिडी काढून टाकण्यात आली असून, आता कॅन्टीन भारतीय उत्तर रेल्वे ऐवजी आयटीडीसी चालवेल. तसेच जेवणाच्या किमतीही वाढणार आहेत. सबसिडी काढून टाकल्यामुळे यापुढे कमी किंमतीमध्ये जेवण मिळणे बंद होणार आहे. सबसिडी … Read more

Budget 2021: यावर्षी स्वातंत्र्यानंतर प्रथमच अर्थसंकल्पाची कागदपत्रे छापली जाणार नाहीत, कारण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे, यावर्षी बजेटची कागदपत्रे छापली जाणार नाहीत. 1947 नंतरची ही पहिलीच वेळ असेल जेव्हा बजेटची कागदपत्रे छापली जाणार नाहीत. लोकसभा आणि राज्यसभा सचिवालय यांनी संसद सदस्यांना (Member of Parliament) यंदाच्या अर्थसंकल्पातील कागदपत्रांची सॉफ्टकॉपी वापरण्याची विनंती केली आहे. इंग्रजी वृत्तपत्र बिझनेस स्टँडर्डने आपल्या एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. कोविड … Read more

आता NGO रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक असणार आधार, FCRA मध्ये दुरुस्ती करण्याचे विधेयक संसदेने केले मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परकीय मदतीचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने परदेशी योगदान नियमन कायदा (Parliament passes The Foreign Contribution (Regulation) Amendment Bill, 2020) आता लोकसभेनंतर राज्यसभेमधूनही मंजूर झाला आहे. या सुधारणांमध्ये परकीय मदत घेणार्‍या अशासकीय संस्था (NGO) अधिकाऱ्यांसाठी आधार अनिवार्य करण्यात आला आहे. याशिवाय सरकारी अधिकाऱ्यांना परकीय पैसे पूर्णपणे घेण्यास बंदी घालण्याची तरतूद आहे. हे विधेयक … Read more

आता बदलला गेला 65 वर्षांपूर्वीचा जीवनावश्यक वस्तू कायदा; यापुढे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये मसूर आणि बटाटे, कांदे नसणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अत्यावश्यक वस्तूंचा कायदा (Essential Commodities Act) संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाला. तो पास झाल्यानंतर आता धान्य, डाळी, बटाटे, कांदे, खाद्यतेल अशा वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येणार नाहीत. खरं तर, लोकसभेने 15 सप्टेंबर 2020 रोजी अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 2020 ला मंजुरी दिली होती. आता ते राज्यसभेतूनही पुढे गेले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या … Read more

मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण निषेधार्थ केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर-बादल यांचा राजीनामा

दिल्ली प्रतिनिधी । शेतकरी विरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेली सहा वर्षे ‘एनडीए’चा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल शेतकरी विधेयकाच्या समर्थानात अचानकपणे मोदी सरकार मधून बाजूला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हरसिमरत कौर-बादल यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा ट्विटरवरुन … Read more

लोकसभा अध्यक्षांची काँग्रेसच्या ७ खासदारांवर निलंबनाची कारवाई, ‘हे’ आहे कारण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून दिल्ली हिंसाचारासंबंधी चर्चा करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गदारोळ कायम राहिला. या दरम्यान आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या गैरहजेरीत पीठासीन सभापती मीनाक्षी लेखी यांनी काँग्रेसच्या ७ खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित सत्रापर्यंत निलंबित केले. सभागृहात गोंधळ घातल्यामुळे या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबीत करण्यात आलेल्या … Read more

संसदेतील गदारोळामुळे अध्यक्ष ओम बिर्ला दुसर्‍या दिवशीही राहिले लोकसभेत गैरहजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचारासंबंधी सभागृहात चर्चा करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत अजूनही गदारोळ सुरु आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सभागृहात विरोधी पक्षांकडून होत असलेला गोंधळ आणि महिला खासदाराशी गैरवर्तनामुळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मंगळवारी झालेल्या गदारोळानंतर ते काल बुधवारी संसदेत पोहोचले मात्र त्यांनी सभागृहात प्रवेश केला नाही. आज गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशीही सुद्धा … Read more

भाजप खासदाराला राहुल गांधींची काळजी! लोकसभेत केली कोरोना टेस्ट करण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात फिरायला आलेल्या इटलीच्या १२ पर्यटकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न होताच आज लोकसभेत सुद्धा हा कोरोनाचा मुद्दा चर्चिला गेला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे खासदार रमेश बिधूरी थेट कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची कोरोना टेस्ट करण्याची मागणी केली. खासदार बिधूरी यांनी इटलीच्या पर्यटकांना कोरोनाची लागण झाल्याचे कारण पुढे करत लोकसभेत राहुल … Read more

तर उदयनराजें विरोधात शिवसेनेकडून ‘हा’ उमेदवार सातारा लोकसभा लढणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे सातारा लोकसभा ची जागा रिक्त आहे. या जागेवर विधानसभा निवडणुकी सोबतच पोटनिवडणूक होणार आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा आपण ताकतीने निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे उदयनराजे … Read more

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

सतारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या साताऱ्यात राष्ट्रवादीला गळती काय थांबता थांबत नाही . राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेत अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून १४ सप्टेंबरला दिल्लीत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीला सोडचिठी देण्याच्या मानसिकतेत असलेले सातारचे खासदार उदयनराजे … Read more