हातगोळे व स्फोटक बारूद जप्त प्रकरणात ३ अटकेत; दुचाकीसह ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा प्रतिनिधी । प्रादेशिक वनविभागाने सातपुड्यातील जूनी वसाडी येथील शिकार्‍याच्या घरावर १० फेब्रुवारीला छापा मारला होता. यावेळी वन्यप्राण्याच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे ७३ हातगोळे व स्फोटक बारूद जप्त करून कालू तेरसिंग अहिर्‍या यास अटक केली होती. या आरोपीने तपासात दिलेल्या जबाबावरून बाकी फरार असलेले ३ आरोपी बदा डुडवा हजरसिंग अमरसिंग चंगळ, दवसिंग अनारसिंग डूडवा रा. शिवाजीनगर जूनी … Read more

कोल्हापूरात जंगलात गस्त घालणाऱ्या वनरक्षकावर हल्ल्याचा प्रयत्न; खैर जातीच्या लाकडासह हत्यार जप्त

खैराच्या लाकडाची तस्करी करणाऱया टोळीने वनविभागाच्या गस्ती पथकाच्या कर्मचाऱयांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. मध्यरात्री पेरीड गावच्या वनहद्दीत ही घटना घडली. वनरक्षक राजाराम बापू राजीगरे हे जखमी झाले आहेत. मलकापूर वनपरिक्षेत्राचे नंदकुमार नलवडे यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.

नागरी वस्तीत आढळलं अस्वल, तब्बल ३ तासानंतर बेशुद्ध करण्यात वनविभागाला यश

शहरातील दुर्गापुर भागात घनदाट वस्तीत अस्वल आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ऊर्जानगर-कोंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्री आठच्या सुमारास ही अस्वल आढळल्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. अस्वलाच्या वावरा नंतर मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी जमली. गर्दीने घाबरलेल्या अस्वलाने शाळेच्या मागच्या भागात असलेल्या प्रसाधनगृहाच्या सांदीत आश्रय घेतला. वनविभागाच्या चमूने सुमारे ३ तास मेहनत घेत बेशुद्धीचे डार्ट मारून अस्वलाला बेशुद्ध केले.

औरंगाबाद शहरात भरवस्तीत आढळला बिबट्या, वन विभागाकडून शोधाशोध सुरू

शहरातील एन-वन परिसरामध्ये आज पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याला फिरताना पाहून सर्वच हादरुन गेले. एन-वन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील नागरिकांनी तात्काळ वनविभाग आणि पोलिसांना याविषयी माहिती दिली आहे. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. काळ गणपती मंदिरा मागील गार्डनमध्ये सकाळी ९ पर्यंत युद्ध पातळीवर बिबट्याचा शोध सुरू केला जात होता.

चामोर्शी तालूक्यात वनविभागाच्या वतीने वनवणव्यावर व्यापक जनजागृती

Untitled design T.

गडचिरोली प्रतिनिधी / आष्टी- वनविभाग आलापल्ली वनपरिक्षेत्र चामोशी,घोट, मार्कडा कन्सोंबा येथे वनविभागाचे वतीने वनवणवा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा अंतर्गत गावागावात जनजागृती रॅली व कलापथकाद्वारे वनवणवा न लावण्या बद्दल नागरिकांत व्यापक जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता चामोर्शी येथे सुरु करुन गौरीपूर,घोट,वरुर,मार्कडा कन्सोबा,आष्टी या गावात परिसरात वनवणवा न लावण्या बदल … Read more