करोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार तेव्हा तयार राहा! शरद पवारांचे भाकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे देशासमोर मोठं आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळं पुढचे काही महीने आपल्याला भरपूर काटकसर करावी लागणार आहे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे आज संवाद साधला. करोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळं वायफळ खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. नगर … Read more

शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणं शक्य नाही- शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. करोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा असंही आवाहन शरद पवार यांंनी केलं. यावेळी त्यांनी कमेंटबॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील दिली. यंदा कोरोनामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणं शक्य नाही आहे. त्यामुळं … Read more

शरद पवार म्हणाले करोनाविरुद्धची लढाई आपण जिंकू, परंतु..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ … Read more

मोदींच्या आवाहनाला शरद पवारांनी असा दिला प्रतिसाद, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणू विरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या … Read more

मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल पवारांनी मानले जनतेचे आभार, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. जनता कर्फ्यूला देशभरातील अनेक राज्यांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद … Read more

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांना दिला ‘हा’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खासदारांना दिल्लीत जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. संसदेचं अधिवेशन सुरु आहे मात्र, करोनाच्या संकटाच्या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांना जेथे असतील तेथेच थांबण्याचा सल्ला पवारांनी दिला आहे. तसेच सरकारी यंत्रणांना मदत करण्याचे आदेश पवारांनी  खासदारांना दिले. कोरोना व्हायरसचे गांभीर्य लक्षात … Read more

शरद पवार राज्यसभेवर बिनविरोध; ‘आमचे दैवत’ म्हणत अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा एकदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यापार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे दैवत असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आमचं दैवत, महाराष्ट्राच्या विकासाचे आधारस्तंभ, आदरणीय पवार साहेबांची राज्यसभेवर पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. आदरणीय साहेबांवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार!” असे म्हणत … Read more

Video Breaking | जयशंकरजी, फिलिपीन्समधल्या आपल्या पोरांना उपाशी मरु देऊ नका, शरद पवार यांचं भावनिक आवाहन

फिलिपीन्समध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी शरद पवार यांनी परराष्ट्रमंत्र्यांना आवाहन केलं आहे.

भीमा कोरेगाव चौकशी समितीकडून शरद पवारांना बोलावणं

भीमा कोरेगाव चौकशी समितीने शरद पवार यांना चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं आहे.

मध्यरात्री आलेल्या “त्या” फोनमुळे पृथ्वीराज चव्हाणांचे आयुष्यच बदलून टाकले | वाढदिवस विशेष

हॅलो विधानसभा | पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव एक आदर्श व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन नेहमीच घेतलं जातं. स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री अशी चव्हाण यांची ख्याती आहे. मुख्यमंत्री पदावर असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीच आपल्या जवळच्या लोकांच्या फाईली माणुस आपल्या गटातला आहे म्हणुन सह्या करुन पुढे पाठवण्याचं काम केलं नाही. पदाचा गैरवापर स्वत; केला नाही आणि सहकार्यांनाही करु दिला नाही. यामुळे त्यांची जनसामान्यात आजही एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्याच पक्षातील, मित्र पक्षांतील लोकांनी त्यांच्यावर कुरखोड्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अकार्यक्षम ठरवलं पण तरी चव्हाण यांनी आपल्या निर्णयांतून आपल्या कामाची छाप पाडली. ते कायम काँग्रेसशीच एकनिष्ठ राहीले. आजच्या घडीला ताटातली भाजी बदलावी त्याप्रमाणे पक्ष बदलण्याचं सत्र सुरु असणार्‍या काळात पृथ्वीराज चव्हाणांसारखा सच्चा माणुस कसा काय बरं राजकारणात पडला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचं झालं असं… Prithviraj Chavan Education

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म १७ मार्च १९४७ चा. वडील आनंदराव चव्हाण पंडीत नेहरुंचे सहकारी आणि ११ वर्ष केंद्रात मंत्री. पुढे आई देखील खासदार. मात्र तरुण पृथ्वीराजचं मन काही राजकारणात नव्हतं. त्या काळात चव्हाण यांनी बी.ई. (आॅनर्स) चे शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या केलिफोर्निया विद्यापिठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. आणि अभियंता म्हणुन एका मोठ्या संस्थेत नोकरी सुरु केली. भाषांच्या संगणकीकरणाविषयी चव्हाण यांनी संशोधन केलं. हे सगळं सुरु असताना १९९१ साली एकदिवस मध्यरात्रीच्या २ वाजता त्यांचा फोन खणानला. त्याकाळी काँग्रेस हायकमांडच्या एका फोनने देशाची राजकीय गणितं बदलायची. पृथ्वीराज चव्हाण यांना आलेला फोन दिल्लीवरुनच होता. राजीव गांधी बोलत होते. “पृथ्वीराज आपको कराडसे लोकसभा चुनाव लढना है। अभी जल्द जा कर चुनाव का अर्ज दर्ज करो. आपका प्रचार करणे मै खूद आऊंगा।” असं राजीव गांधींनी तिकडून सांगितलं. राजीव गांधींकडे तेव्हा एक तरुन, तडफदार नेतृत्व म्हणुन पाहिलं जात होतं. त्यांना पृथ्वीराज चव्हाणांसारख्या हुशार, अभ्यासू, आणि जनतेशी आस्था असणार्‍या नेत्यांची फळी बांधायची होती. त्याचसाठी त्यांनी चव्हाण यांची निवड केलेली. Prithviraj Chavan Education

हायकमांडचा फोन आल्यानं पृथ्वीराज चव्हाण पहाटेच पुण्याहून कराडला निघाले. उमेदवारी अर्ज भरण्याचा तो शेवटचा दिवस होता. कसातरी गडबडीत त्यांनी अर्ज भरला. थोडा धोडका प्रचार केला. आणि ते खासदार म्हणुन निवडून आले. पुढे केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांनी जबाबदारीची कामं पाहीली. नंतर २०१० रोजी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मंध्यरात्री आलेल्या त्या एका फोनमूळे चव्हाण यांचे आयुष्यच बदलून टाकले. एक तरुण उच्चशिक्षित इंजिनिअर खासदार झाला. Prithviraj Chavan Education

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

उदयनराजे म्हणतात ‘स्टाईल इज स्टाईल’, कमिटमेंट कायम राहणार

पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

Coronavirus : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या’ गाड्या ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण