अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा संकटात ; परभणीतील ३ तालुक्यात रब्बीचे प्रचंड नुकसान

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने पालम, गंगाखेड व सोनपेठ तालुक्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल आहे. मागील सात वर्षापासुन फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऐन रब्बी पिके काढणीच्या वेळेला होणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपीठीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बुधवार दि १८ मार्च रोजी जिल्ह्यातील दक्षिणेकडील पालम, गंगाखेड व सोनपेठ … Read more

माती उत्खननप्रकरणी २३ शेतकऱ्यांना तब्बल ४ कोटींच्या दंडाची नोटीस

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शेडशाळ इथल्या विविध शेती गट नंबरमध्ये परवान्यापेक्षा ९ हजार ८९५ ब्रास जादा माती उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरोळ तहसील विभागाने शेडशाळ येथील १० शेतकरी तसेच अंकली, हरिपूर येथील वीटभट्टी व्यावसायिक अशा २३ जणांना ४ कोटी ३५ लाख रुपयांच्या दंडाच्या नोटिसा बजावल्या आहेत. … Read more

उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक, सावकारांकडे असलेलं कर्जही आता माफ होणार

महाविकासआघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी (सावकारी) ६५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

शेती प्रश्नाला वाचा फोडावी म्हणून शेतकऱ्यांचे गोदावरीत जलसमाधी आंदोलन

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे दुष्काळी परिस्थितीमुळ निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडावी व त्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी प्रशासनाला निवेदन पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी गोदावरी नदीतील जलाशयात जलसमाधी आंदोलन केले. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यात बँकांची वसुली, पिक विमा जिल्ह्यातील शेत रस्ते, रस्ते … Read more

बळीराजाला दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी सुद्धा जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली होती. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, तसेच कर्जमाफी योजनेत अचूकता यावी, हा टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्यामागील … Read more

शासनाच्या पहिल्या यादीत सांगली जिल्ह्यातील केवळ ५९६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

सांगली प्रतिनिधी । महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अखेर पहिली यादी जाहीर झाली. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील अवघ्या ५९६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. म्हैसाळ येथील ३७५ आणि बनपुरी येथील बाकी थकबाकीदार शेतकरी आहेत. पहिल्या यादीत कमी लाभार्थी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उर्वरित याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ९० हजार १०७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या … Read more

शेतकऱ्याकडून लाचेची मागणी भोवली; नाफेडच्या ग्रेडर व सहाय्यकाविरुद्ध एसीबीची कारवाई

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे शेती उत्पादीत मालाला भाव देण्यासाठी प्रतवारी च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटलासाठी खरेदीसाठी १०० रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या एका ग्रेडरसह सहाय्यका विरुद्ध शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर गुरुवारी एसीबीने सापळा रचत कारवाई केली. यामध्ये परभणी खरेदी-विक्री संघाच्या ताडकळस परिसरातील कापूस केंद्रावरील नाफेडचा ग्रेडर व सहाय्यक लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. जिल्ह्यात खरेदी केंद्रावर … Read more

सरकारने धरणांवर खर्च करण्यापेक्षा शेतकर्‍यांना ठिबक सिंचन पुरवावं – शरद पवार

सातारा प्रतिनिधी | पाण्याचा प्रश्न पाहता सरकारने शेतकर्‍यांना ठिबक सिंचनाची सुवधा पुरवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील के. एम. शुगर साखर कारखान्याच्या २ लाख ५१ हजाराव्या साखर पोत्याचे पुजन आज पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने ठिबक … Read more

६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्या, गुगल ट्रान्सलेटरचा झटका

सांगली प्रतिनिधी | पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत लाभार्थी असलेल्या ६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. गुगल ट्रान्सलेटरमुळे सदर शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी लाभार्थी असणार्‍या शेतकर्‍यांची यादी सेतु द्वारा करण्यात आली होती. सदर यादीची इंग्रजी भाषेतील … Read more

सात-बारा कोरासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद, राजू शेट्टींचा इशारा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप ते पूर्ण झालेले नाही. राज्याने दिलेली कर्जमाफी तकलादू आहे. सरकार कुणाचेही असो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही. संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते … Read more