औरंगाबाद मनपाच्या वतीने नवीन मतदार नोंदणी सुरु

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता तारखेवर मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना नोंदणी करता यावी, यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. औरंगाबादमधील मतदारांच्या जुन्या यादीतील नावे, फोटोतील दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यादीत नाव नसणारे आणि नवीन मतदार यांना 30 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी … Read more

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या जादा बसेस सुसाट

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सोमवारपासून दिवाळीनिमित्त विविध मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यानुसार औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून पुणे मार्गावर 22 तर नागपूर मार्गावर चार जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. सर्व बसेसना प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दिवाळीनिमित्त मूळ गावी जाणाऱ्या कुटुंबीयांची संख्या मोठी असते. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी … Read more

रात्री ‘या’ वेळेतच वाजवा फटाके; अन्यथा होणार कारवाई

nikhil gupta

औरंगाबाद – रात्री आठ ते दहा या दोन तासातंच फटाके वाजवा, फटाक्यांच्या माळा लावू नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी काल पत्रकार परिषदेत दिला आहे. सर्वोच्च न्यायालय, हरित लवादाचे आदेश पाळा, शांततामय जीवनाचा नागरिकांचा हक्क अबाधित राहण्यासाठी सुधारित, हरित फटाक्यांचाच आग्रह धरा, फटाके घेताना सुधारित, हरित फटाकेच … Read more

दिवाळी नंतर फुटणार पाडापडीचे फटाके ! लेबर कॉलनी क्वार्टर्सवर 8 नोव्हेंबर पासून बुलडोझर

JCB

औरंगाबाद – शहरातील विश्वास नगर, लेबर कॉलनी येथील 20 एकर जागेतील शासकीय इमारती धोकादायक तसेच राहण्यास योग्य नसल्याने त्यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाने 8 नोव्हेंबर रोजी बुलडोजर चालवण्यात येणार असल्याची नोटीस मनपाच्या बांधकाम विभागाने जारी केली आहे. यामुळे तेथील रहिवाशांना आठ दिवसांच्या आत आपल्या सदनिका खाली कराव्या लागणार आहेत. दिवाळीनंतर प्रशासकीय यंत्रणा पाडापाडीचे फटाके … Read more

शिवसेनेच्या ध्वज दिवाळी अभियानाला सुरुवात ! पन्नास हजार घरांवर फडकवणार भगवा ध्वज

ss

औरंगाबाद – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण औरंगाबाद शहरातील जवळपास 50 हजार घरांवर शिवसेनेचा ध्वज फडकवण्याचे ध्वज दिवाळी अभियान आजपासून सुरु झाले. शहरतील अमरप्रीत चौकातून आज या मोहिमेला सुरुवात झाली. या प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे हे उपस्थिती होते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन … Read more

सातारा- देवळाईवर मनपाचा अन्याय का ? आमदार संजय शिरसाट यांचा सवाल

औरंगाबाद – सातारा परिसरातील विकासाच्या कामांसाठी निधीवाटपात अन्याय होऊ देणार नाही. जनहितासाठी व विकास कामांसाठी आपला आग्रह कायम राहील, अशी ग्वाही आमदार संजय शिरसाट यांनी दिली. रविवारी सातारा परिसरातील द्वारकादास नगर, अथर्व क्लासिक येथील सिमेंट रस्त्याचे उद्घाटन व अबरार कॉलनी येथील भूमिगत गटारीचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत … Read more

औरंगाबाद शहराचा आता होणार अंडरग्राउंड नकाशा !

aurangabad mahanagar

औरंगाबाद – शहराचा आता अंडरग्राऊंड नकाशा तयार होणार आहे. प्रभाग नऊमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जीपीआर सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आहे. स्मार्ट सिटी अभियानातून मास्टर सिटी इंटीग्रेटेड प्रकल्प राबविला जात आहे. त्यात जीपीआर सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे जमिनीखालील विद्युत वाहिन्या, पाइपलाइन यासह इतर माहिती मिळणार आहे. मास्टर सिस्टम इंटीग्रेटेड प्रकल्पाचा प्रशासकांनी नुकताच आढावा … Read more

अतिक्रमणाच्या विळख्यातून पैठण गेटची काल मुक्तता; आज चित्र ‘जैसे थे’

atikraman

औरंगाबाद – शहरातील महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या पैठण गेट परिसरात असंख्य लहान-मोठी दुकाने थाटलेली आहेत. मात्र पैठण गेटभोवतीच अनेक हातगाड्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेले होते. त्यामुळे औरंगाबाद शहरातील या बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. गुरुवारी पैठण गेट सभोवतालचे हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. याप्रकरणी पैठणगेट, टिळक पथ, गुलमंडी परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी … Read more

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी कंत्राटदाराला हायकोर्टाचा दणका; ब्लॅकलिस्टमध्ये नाव

High court

औरंगाबाद – शहरातील रस्त्यांचा निकृष्ट दर्जा न राखल्यामुळे कंत्राटदाराला थेट ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे तसेच त्याला बिलापोटी दिलेली रक्कम पुन्हा वसूल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. तसेच शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी तपासणी करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचे आणि या समितीने रस्त्यांविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले. समितीने ज्या रस्त्यांचे काम निकृष्ट झाल्याचे अहवालात सांगितले, … Read more

शहरात वाढणार 11 नगरसेवक; प्रभागांचीही होणार पुनर्रचना

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असतानाच राज्य शासनाने बुधवारी शहराची वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद महापालिकेत आता 11 सदस्य वाढणार आहेत. यापूर्वी असलेल्या 115 वरून सदस्यांची संख्या 126 वर पोचणार आहे तर प्रभागांची संख्या 41 होणार असल्याचे सूत्रांनी … Read more