अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते तर हे नेमके कोण? ; व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा पवारांना सवाल

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही असा दावा केला आहे. परंतू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खोडून काढला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १५ फेब्रुवारी रोजी देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचं ट्विट रिट्विट करत सवाल पवारांना सवाल केला आहे. … Read more

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही ; पवारांकडुन गृहमंत्र्यांची पाठराखण

deshmukh pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमबीर सिंह प्रकरणात महाविकासआघाडी सरकारवर करण्यात येणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावणाऱ्या ATS चे कौतुक केले. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण देखील केली आहे. “ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, … Read more

परमबीर सिंगाच्या लेटरबॉम्बची ‘ईडी’कडून चौकशीची शक्यता; अनिल देशमुख अडचणीत येणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या … Read more

अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर हे अधिकारी चाल सिंहाची दाखवतात अन् वर्तणूक लबाड कोल्ह्याची करतात

Parambir Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना शनिवारी संध्याकाळी घडली. इतिहासात प्रथमच एका पोलीस अधिकाऱ्याने खुद्द गृहमंत्र्यांवर खंडणी गोळा करण्याचा आरोप लावला. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी रविवार दिवसभर विरोधकांनी गदारोळ केला. या प्रकरणावर निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी आपले मत मांडले आहे. अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर हे … Read more

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे गुढ उकलले; माझ्या पोलिस करिअरमध्ये हे प्रकरण आतापर्यंतचे सर्वात अवघड – शिवदीप लांडे

Shivdeep Lande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. महाराष्ट्र एटीएसच्या डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे. रमेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आपल्या करिअरमधील सर्वांत कठीण केस असल्याचे लांडे यांनी म्हटले आहे. एटीएसकडून मनसुख … Read more

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार काय? शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटीलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेत्यांची आज दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा झाली. यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत पाटील यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार … Read more

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – एकनाथ बागडी

कराड प्रतिनिधी : संकलेन मुलाणी  ज्या पोलीस दलाचा देशातच नव्हे; तर जगभरामध्ये दबदबा आहे. अशा पोलीस दलाला बदनाम करण्याचे काम महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केले आहे. तसेच परमवीर सिंग यांनी आपल्या स्वार्थासाठी व आकसापोटी असे निर्णय दिल्याचे सांगून त्यांनी पोलीस दलाला बदनाम केले आहे. अशा भ्रष्ट गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष एकनाथ बागडी … Read more

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन ; आंदोलक व पोलिसात झटापट

andolan

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज जालना रोड येथे भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करताना आंदोलक आणि पोलिसांत झटापट पाहायला मिळाली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे 100 कोटी रुपये मगितल्याचा धक्कादायक आरोप गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांनी केला … Read more

मुंबई पोलीस दल जगात सर्वोत्कृष्ट; जे घडलं ते भयंकर – ठाकरे

मुंबई : जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं. त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे असं म्हणत ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिन वाझे ख्वाजा युनूस … Read more

मुंबई आयुक्तांकडे 100 कोटी मागितले तर इतर शहरातील आयुक्तांकडे किती मागितले? – राज ठाकरेंचा सवाल

anil deshmukh raj thackarey

मुंबई : जर गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना १०० कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण जनतेला कळला पाहिजे अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सदर प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी … Read more