औरंगाबाद-पुणे मार्गावर आता धावणार इलेक्ट्रिक बस 

Electric buses

औरंगाबाद – औरंगाबाद-पुणे या गर्दीच्या मार्गावर साधारण जुलैपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्याची तयारी महामंडळाने केली आहे. यासाठी औरंगाबाद आगाराला 20 इलेक्ट्रीक बस दिल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक बससेवा सुरु होणार असल्याने महामंडळाने चार्जिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात केली असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.   राज्य शासनाने स्वीकारलेल्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाच्या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या ताफ्यात … Read more

जिल्ह्यातील 440 केंद्रांवर आज बारावी इंग्रजीचा पेपर

औरंगाबाद – शाळा तेथे परीक्षांचे नियोजन असल्याने जिल्ह्यातील 470 कनिष्ठ महाविद्यालय शाळांपैकी 153 मुख्य तर 287 उपकेंद्र अशा 440 परीक्षा केंद्रांवर 58 हजार 347 विद्यार्थी आज परीक्षा देणार आहेत. इंग्रजीची परीक्षा असल्याने सर्वाधिक विद्यार्थी आज पेपरला असतात. निकोप वातावरणात परीक्षा पार पाडण्याची खरी परीक्षा मुख्याध्यापकांची असणार आहे. जिल्ह्यातील 7 जिल्हास्तरीय, 9 तालुकास्तरीय, समाजकल्याण, आदिवासी विकास … Read more

मराठवाड्यातील 91 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये

औरंगाबाद – रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यात मराठवाड्यातील 91 जणांचा समावेश आहे. ते भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकासह मेल आयडी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसह पालकांच्या माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये मदत कक्ष सुरू केले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण अधिकाऱ्याशी पालकांनी संपर्क साधावा, … Read more

शहरातील मेट्रोसाठी करणार पीएमसीची नियुक्ती; प्रशासकांना निर्णय

Mumbai Metro

औरंगाबाद – शहरात मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या महापालिकेने हालचाली सुरू केल्या होत्या. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी पीएमसी नियुक्त करण्याची फाईल, लेखा विभागात अडकली होती. लेखा विभागाने या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावर निर्णय घ्यावा, असा शेरा मारून फाईल शहर अभियंता विभागाकडे पाठविली आहे. दरम्यान महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आता ही फाईल स्मार्ट … Read more

एसटीचे 12 कर्मचारी बडतर्फ तर 50 जण कामावर हजर

ST

औरंगाबाद – विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचार्‍यांवर एसटी प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. आतापर्यंत 21 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. काल त्यात आणखी भर पडली असून, पुन्हा 12 जणांवर बडतर्फीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 33 झाली आहे. तर काल गंगापूर, वैजापूर आणि सोयगाव या गावातील जवळपास 50 कर्मचारी कामावर … Read more

वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखले; मुलींनीच दिला आईला ‘खांदा’

औरंगाबाद – देवाचे रूप असलेल्या आईला तिच्या पोटच्या गोळ्यांनीच वीस वर्षांपूर्वी घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा ‘त्या’ आईला आधार दिला, तो मुली व जावयांनी. अखेर वृद्धापकाळाने शनिवारी त्या आईने जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोघांनी फक्त पाहुण्यांसारखी हजेरी लावल्याने, संतप्त लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. तिन्ही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने … Read more

आजपासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ; शहरात ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

औरंगाबाद – केंद्र सरकारने आज पासून 15 ते 18 वयोगटातील तरुणांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचे जाहीर केले. या लसीकरणाचा शुभारंभ सकाळी 10:30 वाजता महापालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयात पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेने शहरातील सहा केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे. 15 ते 18 या वयोगटातील 69 हजार 998 जन असावेत असा अंदाज … Read more

घरफोड्या करून चोरट्यांनी केले नववर्षाचे स्वागत; वाळूज परिसरात सात घरफोड्या

Gharfodi

औरंगाबाद – वाळूज परिसरात वडगाव (को) येथील गट क्रमांक पाच व गट क्रमांक आठमधील एकूण बंद असलेल्या सात घरांचे कडी, कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोने, चांदी असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. सर्वजण नववर्षाच्या स्वागताला लागलेले असल्याने चोरट्यांनी हा डाव साधला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस गस्त घालण्याची मागणी करण्यात … Read more

ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटात घाटीतील निवासी डॉक्टर संपावर

औरंगाबाद – समुपदेशन प्रक्रिया तात्काळ व्हावी व अन्य मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला. काल पासून त्यांनी संप सुरू केला असून सकाळच्या सत्रात त्यांनी बाह्यरूग्ण विभागासमोर निषेध व्यक्त केला. राज्यभर आंदोलनाचे वारे वाहत असून मुंबईतील ‘मार्ड’ या संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी गुरूवारी संप सुरू केला. या संपात औरंगाबादच्या घाटी … Read more

घर रिकामे करण्याच्या वादातून पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

crime

औरंगाबाद – घर रिकामे करण्याच्या वादावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण करत चाकू हल्ला केल्याची घटना शहरातील रमानगरात उघडकीस आली आहे. या विवाहितेला घाटीत दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानपुरा भागातील रमानगरातील रमेश शिरसाठ या कंपनीतील कामगार आहे. गल्लीत बदनामी … Read more