खुद्द प्रशासकांनीच नागरीकांच्या घरी जाऊन दिली लस

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेण्यास नागरिक टाळाटाळ करीत असल्याचे पाहून काल मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी स्वतः जटवाडा रोड वरील सारा सिद्धी भागात जाऊन नागरिकांना दुसरा डोस दिला. शहरात शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. 72 हजार नागरिक दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सकाळी अचानक जटवाडा रोड वरील सारा सिद्धी वसाहतीत … Read more

फटाका फुटला अन् नवरदेवाला घेऊन घोडा सुसाट निघाला मागे वऱ्हाडही धावले

औरंगाबाद – डीजेच्या तालावर तरूणाई बेधुंद होऊन नाचायला लागली. मंडपात लवकर जाण्याच्या ओढीने नवरदेवही घोड्यावर स्वार झाले. तिकडे नवरीबाईही सजल्या-धजल्या, अन् अशात नवरदेव स्वार झालेल्या घोड्याच्या मागे कुणीतरी सुतळी बॉम्ब पेटविला. क्षणात धडाम् धूम आवाज झाला. तो ऐकून घोडा बिथरला अन् नवरदेवाला घेऊन सुसाट निघाला ! त्यांना शोधायला अख्खे वऱ्हाड धावले अन् गावकरीही सरसावले. शेवटी … Read more

आपली मागणी मान्य करवुन घेण्यासाठी चक्क तीन तास टाॅवर चढून आंदोलन

tower

औरंगाबाद – आमदार अतुल सावे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांची आमदारकी रद्द करावी, या मागणीसाठी एकाने टाॅवर चढून आंदोलन केले. आज औरंगाबाद तहसिल कार्यालयाजवळ ही घटना घडली. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी समजूत काढल्यावर आंदोलनकर्त्याने आंदोलन मागे घेतले. आंदोलकाचे नाव संभाजी भोसले असे आहे. त्यांनी टाॅवर साधारण तीन तासांपेक्षा अधिक वेळ आंदोलन केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना … Read more

आता औरंगाबादेत होणार ओमिक्रॉन टेस्ट

Corona

औरंगाबाद – ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग ओळखण्यासाठी आवश्यक असलेली जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट आता पुण्यातील प्रयोगशाळेत नव्हे तर औरंगाबादच्याच प्रयोगशाळेत केली जात आहे. एवढे दिवस कोरोना रुग्णांचे स्वॅब पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. त्यामुळे रुग्णांचे अहवाल येण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत होती. आता मात्र ही तपासणी घाटीतील प्रयोगशाळेत होत … Read more

नव्या वर्षात नांदेड-पुणे रेल्वेचे रुपडे पालटणार; परंतु पुणे ऐवजी ‘या’ स्थानकापर्यंत धावणार

lhb

औरंगाबाद – सध्याची नांदेड-पुणे जुनी साप्ताहिक एक्सप्रेसचे रूपांतर नव्या वर्षात नांदेड-हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये करून ती आठवड्यातून दोन दिवस चालवण्यात येणार आहे. तसेच रेल्वेच्या रचनेत बदल करून तिला अत्याधुनिक एलएचबी कोचेस लावण्यात येणार आहेत. याशिवाय तिथे थांबे आणि वेळापत्रकही बदलण्यात येणार आहे. नांदेड पुणे या द्वी साप्ताहिक एक्सप्रेस च्या वेळेत, रेल्वे स्थानकात आणि रचनेत बदल … Read more

सिडकोतील 7 हजार घरांना नोटीस; नागरिकांमध्ये खळबळ

औरंगाबाद – सिडको-हडकोचे मनपाकडे हस्तांतरण झाल्यापासून आजपर्यंत या भागातील मालमत्ता कराचे सर्वेक्षण करण्यात आले नव्हते. मनपा प्रशासनाने केलेल्या पाहणीत अनेक मालमत्ताधारकांनी वाढीव बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. पहिल्या टप्प्यात सात हजार मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महानगरपालिका वाढीव बांधकाम कधीपासून झाले याची माहिती घेऊन नवीन करा करणार आहे. सिडको-हडकोचे … Read more

अहो आश्चर्यम ! मृत महिलेस दिली कोरोना लस

vaccine

औरंगाबाद – ओमिक्रोनचा वाढता धोका लक्षात घेऊन सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच कोरोनाने मयत झालेल्या महिलेवर आरोग्य यंत्रणेनेच अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर चक्क सात महिन्यांनी 18 डिसेंबर रोजी तिला कोविडचा पहिला डोस दिल्याचा संदेश पाठवल्याने आरोग्य खात्यामधला सावळागोंधळ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. … Read more

मराठवाड्यात पावसाचा मुक्काम वाढला; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

औरंगाबाद – सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मराठवाड्यात मुक्काम ठोकणाऱ्या पावसाने आणखी काही दिवस बरसण्याची चिन्ह दाखवली आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हा प्रभाव पुढील 12 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात पुढील 4 ते 5 दिवस वीजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यांत … Read more

कोट्यवधींचा हेल्थ केअर घोटाळा ! आरोपी आर्थिक गुन्हेशाखेच्या ताब्यात

Fraud

औरंगाबाद – दरमहा 350 रुपये याप्रमाणे 20 महिने 7 हजार रुपये गोळा करून शहरातील शेकडो नागरिकांना तब्बल 30 लाख 13 हजार 85 रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात हेल्थकेअर कंपनीचा प्रमुख नंदलाल केसरसिंग याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. घोटाळा कोट्यावधी रुपयांचा असल्याची माहिती शिक्षक दादाराव सिणगारे यांनी दिली आहे. तसेच ज्यांनी तक्रार केलेली नाही, त्यांनी … Read more

संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

uday samant

औरंगाबाद – भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक मूल्ये व संस्कारांची समाजात निर्मिती करणे, सांप्रदायिक कलांचा अभ्यास करणे अशी अनेक उद्दिष्ट्ये संतपीठ स्थापनेमागची आहेत. ह्या उद्दिष्टांची पुर्ती करण्यासाठी श्री क्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकारत लवकर सुरु करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विभागीय … Read more