खळबळजनक! लस न देताच डॉक्टरने दिले 80 बोगस लस प्रमाणपत्रे

vaccine

औरंगाबाद – महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील घोटाळ्यांची मालिका सुरूच आहे. बोगस रुग्णांचे प्रकरण गाजल्यानंतर आता बोगस लसीकरण प्रमाणपत्राचे प्रकरण उघडकीस आले आहे. तब्बल नऊ जणांनी कोरोनाची लागण झालेली नसताना उपचार घेतल्याचे दाखवत कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीला लाखोंचा गंडा घातल्याने प्रकरण पोलिसांत गेले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने बोगस प्रमाणपत्राची चौकशी केली असता, तब्बल 80 जणांनी … Read more

महापालिकेने 1728 कोटी रुपयांतून दाखविले शहराच्या विकासाचे ‘स्वप्न’

औरंगाबाद – महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी 2022-23 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. 1728 कोटी 15 लाख 80 हजार रुपयांचा अर्थसंकल्प असून, 1726 कोटी 39 लाख 71 हजार रुपये अपेक्षित खर्च आहे. त्यामुळे एक कोटी 76 लाख नऊ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रशासक पांडेय यांनी सलग तिसऱ्या वर्षी अर्थसंकल्प … Read more

सत्ताधाऱ्यांविना मनपाचा तिसरा अर्थसंकल्प आज होणार सादर

औरंगाबाद – महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविना आज सलग तिसरा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तिन्ही अर्थसंकल्प सादर करण्याचा मान प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना मिळत आहे. प्रशासक अस्तिक कुमार पांडेय आज दुपारी साडेतीन वाजता प्रशासकीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक वॉर्डाला एक कोटी रुपये विकास कामांसाठी देण्यात येणार आहेत. शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांसाठी 200 कोटी … Read more

एप्रिलपासून पुर्ण क्षमतेने धावणार स्मार्ट शहर बस

smart city bus 1

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा महापालिकेच्या स्मार्ट बसवरही झाला आहे. माजी सैनिकांच्या मदतीने कशाबशा 100 पैकी 11 शहर बस सुरू ठेवल्या आहेत. मात्र, आता प्रशासनाने खासगी एजन्सीच्या माध्यमातून 360 चालक- वाहक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खासगी एजन्सीकडून निविदा मागविण्यात आल्या आहे. लॉकडाउननंतर सुरू झालेली स्मार्ट सिटी बस एसटी महामंडळातील कर्मचारी संपामुळे पुन्हा अडचणीत … Read more

शहरातील कोवीड सेंटरमधील लाखोंचे साहित्य गायब

औरंगाबाद – कोरोना संकटात रुग्णांचा आधार ठरलेल्या कोविड सेंटरमधील लाखो रुपयांचे साहित्य अचानक गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेने शहरात कोविड सेंटर्स सुरु केले होते. शासनाच्या निधीतून यात लाखो रुपयांचे साहित्यही खरेदी करण्यात आले होते. सध्या काही महिन्यांपासून रुग्णसंख्या घटल्याने हे कोविड सेंटर्स बंद करण्यात आले आहेत. मात्र … Read more

मनपाने 150 कोटी दिल्याने ‘स्मार्ट’ कामांना येणार गती

औरंगाबाद – स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला 31 मार्चपूर्वी 250 कोटी रुपयांचा वाटा करणे बंधनकारक होते. मनपा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपये मंगळवारी दिले. उर्वरित 100 कोटी लवकरच देण्यात येणार आहे. यापूर्वी मनपाने 68 कोटी रुपये स्मार्ट सिटी जमा केले. ही रक्कम मनपा परत घेणार असल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी संतोष वाघुळे यांनी दिली. केंद्र शासनाचे … Read more

जुन्या थकबाकीदारांवर आता थेट जप्तीची कारवाई

औरंगाबाद – मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आणि आर्थिक वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. राहिलेल्या दिवसांत मालमत्ता कर वसुलीसाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जाणार आहे. तर ज्यांच्याकडे वर्षानुवर्षे दाद देत नाहीत अशा थकबाकीदारांवर आजपासून थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. कोरोना महामारीमुळे 2020 पासून महापालिकेचे शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. तथापि … Read more

यंदाही उन्हाळ्यात औरंगाबाद शहरात ‘पाणीबाणी’

Water supply

औरंगाबाद – शहरातील पाणी टंचाईची तिव्रती कमी करण्यासाठी किमान दोन दिवस आड पाणी देण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरात येणाऱ्या पाण्यात वीस एमएलडीने वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. पण मार्च महिना अर्धा संपला तरी यासंदर्भात काम सुरू झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात देखील नागरिकांनी पाणी टंचाईला सामोरे जावे … Read more

सुहास दाशरथेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’ 

mns

    औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी पक्षाला एक धक्का बसला आहे. 14 डिसेंबर 2019 रोजी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पद काढून घेतल्यानंतर अडगळीला पडलेल्या श्वास दशरथे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले. यामुळे ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. … Read more

वेध मनपा निवडणूकीचे ! औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस जम्बो कार्यकारिणी जाहीर

Youth Congress

औरंगाबाद – शहरातील महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अनेक दिवसांपासून रखडलेली काँग्रेसची कार्यकारिणीही जाहीर झाली. प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी घोषित केली असून यात तब्बल दीडशे जणांची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मराठवाड्यात काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला अत्यंत थंड प्रतिसाद असल्याचे उघडकीस आले होते. याबद्दल वरिष्ठांनी नाराजीही … Read more