मुलाच्या मारहाणीत मद्यपी पित्याचा मृत्यू; अडीच महिन्यानंतर शवविच्छेदनातून झाला खुलासा

death

औरंगाबाद | तोल जाऊन पडल्याचे सांगत मद्यपी पित्याला मुलाने अडीच महिन्यांपूर्वी घाटीत दाखल केले होते. मात्र, त्या मद्यापीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा दिसून येत असल्याने एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घाटीच्या डॉक्टरांकडून अहवाल मागवताच त्या मद्यपीचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी कुटुंबियांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता दारू पिऊन दररोज घरात … Read more

वटपौर्णिमेलाच चोरांनी हिसकावले सौभाग्याचे लेणे; तीन घटनांनी हादरले शहर

mangalsutra theft

औरंगाबाद | वटपौर्णिमेनिमित्त घराबाहेर पडलेल्या शिक्षिकेसह दोन गृहिणींचे सौभाग्याचे लेणे दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात पुन्हा एकदा मंगळसूत्र चोरांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. ही घटना गुरुवारी शहरातील महानुभाव आश्रम, समर्थनगरातील सुंदर लॉज आणि एमआयडीसी वाळुज परिसरातील सिडको महानगरात  घडली. या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वटपौर्णिमेला वडाची पुजा … Read more

प्रियसीने भेटायला नकार दिल्याने तरुणाची अपार्टमेंटच्या छतावरून उडी मारून आत्महत्या

suicide

औरंगाबाद | लग्न झालेल्या प्रेयसीने भेटायला नकार दिल्यामुळे एका प्रियकराने अपार्टमेंटच्या छतावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना इटखेडा येथे बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तुषार संजय गायकवाड (32,रा.ठाणे )असे मृताचे नाव आहे. लग्न झालेल्या प्रेयसीने भेटायला आणि त्याच्यासोबत घराबाहेर पडायला नकार दिल्याने त्याने आरडाओरड करत अपार्टमेंटच्या छतावरुन उडी मारून … Read more

टायर फुटल्याने दोन एस.टी.चा भीषण अपघात; चालक गंभीर, प्रवासी सुखरूप

Bus Accident

औरंगाबाद | समोरील टायर फुटल्याने नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या एस.टी.ला बस धडकली. दरम्यान दोन्ही बस एकमेकांत अडकल्याने सुमारे दोनशे फूट दोन्ही बस घासत गेल्या. या अपघातात चालक गंभीरपणे जखमी झाला आहे.सुदैवाने दोन्ही बस मधील प्रवासी सुखरूप असून कुणालीही इजा झालेली नाही. मात्र एस. टी.चे मोठे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास … Read more

सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा

Samyek front

औरंगाबाद | सम्यक विद्यार्थी आंदोलनच्यावतीने गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. विद्यापीठातील वाय पॉईंट मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. पीएचडी ऑनलाइन प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात यावी, एम. फिल / पीएचडीचे जून चे राहिलेले प्रबंध जमा करण्यास 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, विद्यापीठातील वसतिगृह सुरू करण्यात … Read more

अमरप्रीत चौकात उड्डाणपूलाची गरज – खा. जलील

imtiaz jalil

औरंगाबाद | चिकलठाणा विमानतळ ऐवजी शहरातील अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश द्यावे यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. अमरप्रीत चौक आणि आकाशवाणी या ठिकाणी वाहतूकीची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे या दोन ठिकाणी उड्डानपुल करा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन … Read more

12 वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेत केली आत्महत्या

suicide

औरंगाबाद | एन-11 हडको येथील नवजीवन कॉलनीत राहणाऱ्या 12 वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष झाले नाही.अस्मिता संतोष वाघले (वय 12) असे या मुलीचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी आई मेसवर पोळ्या करण्यासाठी गेली असता अस्मिताने घराचा मेन दरवाजा लावून घेतला आणि समोरच्या रूम मध्येच छताच्या हुकला नायलॉन … Read more

औरंगाबाद दुचाकी चोरीचे सत्र सुरूच; एका बुलेटसह सहा दुचाकी लंपास

औरंगाबाद : वाहन चोरट्यांनी शहर परिसरात धुमाकुळ सुरूच असून चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून एका बुलेटसह अर्धा डजन दुचाकी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊन लागल्यापासून शहरामध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. शेख जुबेर शेख चाँद (वय23) रा.हमालवाडा,रेल्वेस्टेशन परिसर यांची बुलेट क्रमांक (एमएच-20-एफए-4786) चोरट्याने 18 जून रोजी घराजवळून … Read more

घाटीतील सिटीस्कॅन मशीन सहा महिन्यापासून बंद

machine

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालय येथील सिटीस्कॅन मशिन बंद पडल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये केबल खराब झाल्याने मशीन बंद झाली होती. मे महिन्यात केबल दुरुस्त झाले. मात्र डेमो घेतल्या नंतर दुसऱ्या दिवशी मशीन बंद पडली. त्यामुळे आता पुन्हा त्याचे पार्ट दुरुस्त करण्यात येत आहेत. यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहेत विशेष म्हणजे मार्च … Read more

पुट्ठ्याच्या कंपनीला शॉर्टसर्किटमुळे आग; वाळूज येथील घटना

fire

वाळूज : के – 129 सेक्टरमधील व्ही. इंडस्ट्रीजला मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत यंत्रासह तयार केलेला कच्चा माल जाळून खाक झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज मालकाने केला आहे. संजय आहिरे (रा. विटखेडा) व संदीप डहाळे ( रा. औरंगाबाद ) या दोघांनी भागीदारात के सेक्टरमध्ये व्ही. व्ही. इंडस्ट्रीज व एम सेक्टरमध्ये श्री पॅकेजिंग … Read more