दौलताबाद घाटात सुसाट वाहनाच्या धडकेत बाप-लेक जागीच ठार; मामा जखमी

Accident

औरंगाबाद : दौलताबाद घाटात एका वाहनाने फुगे विकून शहरात परतणाऱ्या बाप लेकीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फुगे विकून वडील, त्यांची मुलगी आणि मुलीचा मामा एका दुचाकीवरून औरंगाबादला येत होते. त्यावेळी दौलताबाद घाटात सुसाट वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे तिघेही दूरवर फेकले गेले.जाधववाडी येथे राहणाऱ्या 23 वर्षीय मोनिका … Read more

कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या ; मृतदेह घाटीत सोडून पत्नी गेली निघून

crime

औरंगाबाद : पती-पत्नीमध्ये होणाऱ्या भांडणाला वैतागून पतीने राहत्याघरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना एन-12 भागात घडली आहे. ही गळफास घेतल्यानंतर पत्नीने पतीला घाटी रुग्णालयात सोडून निघून गेली. विशाल हिरालाल खाजेकर असे (वय 24) वर्षीय मृताचे नाव आहे. मृताच्या भावाने दिलेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री विशालचे पत्नी सोबत वाद झाला होते. त्यानंतर विशालने राहत्या … Read more

शहरवासीयांना एक दिवस उशीरा होणार पाणीपुरवठा 

औरंगाबाद: शहराला पाणीपुरवठा करणारी 1200 मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन मंगळवारी(ता. आठ) रात्री चितेगाव जवळ फुटल्याने पाणी पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात 700 मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन फुटली होती.1200 मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईन ची दुरुस्ती केली जात असली तरी नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशिराने नागरिकांना पाणी मिळणार आहे. गेल्या आठवड्यात पैठण जवळील पिंपळवाडी येथे सातशे … Read more

मराठवाडय़ात ७४.२६ टक्के लसीकरण पूर्ण 

Lasikaran

औरंगाबाद | राज्याकडून मिळालेल्या लसीच्या प्रमाणात मराठवाडय़ात ४.२६ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये एक लाख १९ हजार ४५४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा, तर ५३ हजार ६६९जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात आणि जिल्ह्यात पोलीस दलात लसीकरणाचा वेग अधिक असून कोविड नियंत्रणासाठी अग्रभागी असणाऱ्यांनी लसीकरणाला वेग दिला. आतापर्यंत अग्रभागी काम करणाऱ्या एक … Read more

घाटीच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला; मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी करावी लागते प्रतीक्षा

Sangli Coronavirus Death

औरंगाबाद : सद्यस्थितीत घाटीत दररोज २० ते २५ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत आहेत आणि त्यामुळे व्यवस्थेवरील ताण वाढल्याने मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे दीड हजार नवे बाधित आढळून येत आहेत आणि सुमारे २० ते २५ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान एकट्या घाटीत मृत्यू होत आहे. त्यामुळे घाटीच्या व्यवस्थेवर दुपटीने-तिपटीने ताण वाढला आहे. कोरोनाबाधित … Read more

बिडकीन ग्रामीण रूग्णालयास आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

sunil chavan

औरंगाबाद : कोरोना विषाणू प्रसाराला आळा घालण्यासाठी बनविण्यात आलेली प्रतिबंधात्मक लस पात्र व्यक्तींना अधिकाधिक प्रमाणात देण्यात यावी. यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी बिडकीन ग्रामीण रूग्णालयाच्या पाहणी दरम्यान दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, दररोज किमान 100 नागरिकांचे लसीकरण करण्यात … Read more

मार्चअखेरीस महापालिकेची १३६ कोटींची वसुली

aurangabad

औरंगाबाद : कोरोनामुळे यंदा मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीला महापालिकेस गतवर्षी प्रमाणे फटका बसला आहे. वर्षभरात केवळ २२.९९ टक्के वसुली झाली असून, १३६ कोटी ८२ लाख ७८ हजार ३०५ रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. कोरोना संसर्गामुळे गतवर्षी महापालिकेला कर वसुलीत मोठा फटका बसला होता. यंदाही दिवाळीपर्यंत परिस्थिती नाजूकच होती. दिवाळीच्यानंतर कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यामुळे पालिकेने … Read more

कोरोनातून बरे झाल्यावर लोकांमध्ये जनजागृती निर्माण करा’ ; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे कोरोनाबाधित रूग्णांना आवाहन

औरंगाबाद : कोरोना लढाईत आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. तुमची संपूर्ण काळजी घेतली जाईल. तुम्ही लवकर बरे व्हा, बरे झाल्यावर लोकांमध्ये कोरोना आजार होऊ नये या संदर्भात घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती करा, असे आवाहन पैठण येथील कोरोनाबाधित रूग्णांना त्यांच्याशी संवाद साधताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी केले. पैठण येथील समाजकल्याण मुलींच्या वसतिगृहात असलेल्या कोविड केअर सेंटरमधील … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद

corona

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 1458 जणांना (मनपा 1086, ग्रामीण 372) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 71340 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1508 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88489 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1788 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15361 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या … Read more

अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयांतील खाटांबरोबर कार्यरत मनुष्यबळही अपुरे पडत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. एकट्या घाटीत तज्ज्ञ डाॅक्टरांसह ५५२ आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे, तर ग्रामीण भागासाठी ८७ डाॅक्टर्स, परिचारिकांची आवश्यकता आहे. अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर कोरोना रुग्णसेवा देण्याची कसरत करण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर ओढावत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more