ग्रामीण भागांतील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट

औरंगाबाद – राज्य शासनाने प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग बुधवारपासून सुरु करण्यास जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी परवानगी दिली आहे. कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन करु जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रामध्ये भराव्यात, एका वर्गात जास्तीतजास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, विद्यार्थ्यामध्ये … Read more

नात्याला काळीमा ! मेहुण्यानेच केला सालीवर अत्याचार

rape

औरंगाबाद – विवाहित लहान सालीवर अत्याचार करणाऱ्या मेहुण्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीला रविवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे मेहुणा आणि सालीच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे. हद्दीतील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या रहिवासी २२ वर्षीय विवाहितेचा पती शेंद्रा येथील कंपनीत नोकरीला आहे. … Read more

महावितरण विरोधात शेकडो शेतकरी रस्त्यावर

Kannad

औरंगाबाद – महावितरण विरोधात जिल्ह्यातील कन्नड शहरात आज शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून महावितरण तर्फे शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली केली जात आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट होती. आज महावितरणच्या या वसुलीविरोधात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने शेतऱ्यांकडून सक्तीने सुरू असलेल्या वीज बिल … Read more

शहर बससेवेला संपाचा ‘स्मार्ट’ फटका; प्रवाशांचे हाल

smart city bus

औरंगाबाद – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असताना शहर बस सेवेतील कर्मचारी देखील त्यात सहभाग झाल्याने शहरवासीयांचे अतोनात हाल होत आहेत. मनपा प्रशासन शहर बस सेवा सुरू करण्यासाठी आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु अद्यापही मनपाच्या ‘स्मार्ट’ प्रशासनाला यावर तोडगा काढण्यात यश आलेले नाही. औरंगाबाद मनपाने … Read more

कुठून येते इतकी हिंमत ? चक्क स्मशानभूमीच्या जागेवरच केली प्लॉटिंग

Fraud

औरंगाबाद – बेकायदा प्लॉटिंगचे प्रकार शहरात मनपा हद्दीत नेहमीच घडतात. मात्र आता तर चक्क स्मशानभूमीच्या राखीव जागेवरदेखील प्लॉटिंग केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शहरातील शहानूरवाडी भागात स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या दोन एकर जागेवर अशाच पद्धतीने बेकायदा प्लॉटिंग करण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी ही प्लॉटिंग निष्कासित करून स्मशानभूमीची जागा मोकळी केली. या सर्व प्रकारामुळे मनपाच्या … Read more

ओमिक्रॉनची धास्ती; परदेशी प्रवास करून आलेल्या प्रवाशांची माहिती द्या – जिल्हाधिकारी

Sunil chavhan

औरंगाबाद – सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये कोव्हिड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा प्रकार आढळून आल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. यापार्श्‍वभूमीवर विमानाद्वारे परदेशातून गेल्या 20 दिवसात शहरात आलेल्या प्रवाशांची माहिती कळविण्याची सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विमानतळ प्राधिकरणाला केली आहे. सध्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा प्रसार होण्याचा संभव लक्षात घेऊन मागच्या 20 दिवसांत परदेशातून प्रवास करून … Read more

पुणे मार्गावर धावल्या 180 खासगी शिवशाही बसेस

औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे विविध मार्गांवर धावणारे लालपरी ठप्प झाली आहे. औरंगाबादेतून पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवासी असल्यामुळे या मार्गावर मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने खाजगी शिवशाही सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 14 नोव्हेंबर पासून आतापर्यंत महामंडळाच्यावतीने 180 खासगी शिवशाही बसेस पुणे मार्गावर चालवण्यात आल्या आहेत. यातून … Read more

सुसाईड नोटमध्ये 13 जणांची नावे असूनही ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल नाही

suisaid

औरंगाबाद – सातारा परिसरातील 41 वर्षीय तलाठी लक्ष्मण नामदेव बोराटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी समोर आला होता. सुसाईड नोटमध्ये 13 जणांची नावे लिहली आहेत, असे असतानाही आणखी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. केवळ अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलिसांत करण्यात आल्याने बोराटे यांच्या नातेवाईकांनी सोमवारी पोलिस उपायुक्त … Read more

मराठवाड्यात तीन दिवस पावसाची शक्यता 

Heavy Rain

औरंगाबाद – मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार आज, उद्या आणि गुरुवारी या तीन दिवसात मराठवाडा विभागातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये आज मराठवाडा विभागातील औरंगाबाद, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात … Read more

जिल्हा परिषदेचे देखील वाढणार आठ गट 

औरंगाबाद – राज्य मंत्रिमंडळाने काल राज्यातील जिल्हा परिषदांची संख्या वाढविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढलेली मतदार संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेचे आठ गट वाढण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत पंचायत समितीचे 16 गण वाढतील त्यामुळे सदस्य संख्या 62 वरून 70 होऊ शकते. फेररचना झाल्यास आरक्षणाचे रोटेशन न होता उतरत्या क्रमाने गट, गण सुटतील असे राजकीय … Read more