ग्रामीण भागांतील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट

औरंगाबाद – राज्य शासनाने प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग बुधवारपासून सुरु करण्यास जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी परवानगी दिली आहे.

कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन करु जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रामध्ये भराव्यात, एका वर्गात जास्तीतजास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, विद्यार्थ्यामध्ये कोणतेही लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात पाठवण्याची सोय करावी, कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यास तात्काळ शाळा बंद करुन निर्जंतूकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकाने करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना उपस्थितीबाबत बंधन नाही. मात्र, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी, शिक्षकांनी लहान मुलांचे शाळेत स्वागत करुन उत्साह वाढवावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना –
– लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाच शाळेत प्रवेश
– शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात,
– एका बाकावर एकच विद्यार्थी या प्रमाणे बैठक व्यवस्था
– गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळा आवारात प्रवेश देवू नये
– शिक्षकांनी शक्यतो गावामध्येच राहण्याची व्यवस्था करावी.
– ग्रामीणमधील पहिली ते चौथी शाळा व विद्यार्थी

 

You might also like