धक्कादायक ! दोन वर्षीय मुलीचे अपहरण करून कपाटात कोंडले

Crime

औरंगाबाद – मागील काही महिन्यांपासून मराठवाड्याची राजधानी गुन्हेगारांची राजधानी बनत आहे. शहरात दिवसागणिक गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. अशातच शहरातील दलालवाडी परिसरातील दोन वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला चक्क कपाटात कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना काल रात्री उघडकीस आली. मात्र सुदैवाने आसपासच्या नागरिकांना मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने या आरोपिचे बिंग फुटले आणि या मुलीचे प्राण वाचले. … Read more

सलग दुसऱ्या दिवशीही जालन्यात ईडीचे छापे

ed khotkar

जालना – जालन्यात ईडीच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी छापे सुरू आहेत. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर सभापती असलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज शनिवारी ईडीच्या पथकाकडून झाडाझडती सुरू आहे. कालपासून ईडीचे पथक जालन्यात छापेमारी करत आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर … Read more

वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडविण्याची धमकी; मंदिर विश्वस्तांना आलेल्या पत्रामुळे खळबळ

parli

बीड – ‘आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन’ अशी धमकी असलेल्या … Read more

गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक ‘लाचेच्या’ जाळ्यात

Lach

औरंगाबाद – मोजणी केलेल्या जमीनीचा हद्द कायम नकाशा देण्यासाठी 7 हजारांची लाच घेताना गंगापूरच्या भूमी अधीक्षक कार्यालयातील लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले आहे आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. करमचंद कचरू कोलते (39) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांच्या … Read more

शहराचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत, ‘हे’ आहे कारण

Water supply

औरंगाबाद – शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या 56 व 100 दलली योजनेवरील नवीन व जुने जायकवाडी उद्भव पंपगृहास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत जोडणी करण्यात आलेल्या दोन्ही स्वतंत्र 33 के. व्ही. उच्च दाब विद्युत वाहिनीवर बिघाड झाल्याने दोन्ही पंपगृहाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे मनपा प्रशासनाने एका प्रसिद्धि … Read more

मनपातील तब्बल 21 ठराव गुलदस्त्यात; प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ

औरंगाबाद – महापालिकेत प्रशासकीय कार्यकाळात पारदर्शक कारभारांचा दावा केला जात असला तरी ठरावांची मात्र लपवाछपवी केली जात आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महिनाभरात 22 ठराव मंजूर केले. यातील एक ठराव रचना विभागाचे प्रभारी निवृत्त उपसंचालक जयंत खरवडकर यांना फेरनियुक्ती देण्याचा आहे. पण उर्वरित 21 ठरावांची माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या ठरावात … Read more

शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त तर प्रशासन सुस्त

railway shivajinagar

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सर्वात वर्दळीचे रेल्वेफाटक अशी ओळख असणारे शिवाजीनगर रेल्वेफाटक २४ तासांत ३६ वेळा चालूबंद केले जाते. रेल्वेगाडी फाटक ओलांडून जाईपर्यंत फाटक बंद केले जाते आणि दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. दिवसेंदिवस रांगा वाढतच आहेत. यामुळे फाटक परिसरातील दुकानदार आणि रहिवासी त्रस्त झाले आहे. तोच दुसरीकडे प्रशासन मात्र … Read more

औरंगाबाद शहरातील ‘या’ मार्गावर होणार तीन मजली उड्डाणपुल

nitin gadkari

औरंगाबाद – नागपूरच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात लवकरच तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल औरंगाबाद-वाळुज या 20 किलोमीटर महामार्गावर उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी काल सायंकाळी लातूरात केली. दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते काल लातूर जिल्ह्यातील दोन हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचे … Read more

राज्यात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे कायदे; खासदार जलीलांचा सरकारवर घणाघात

औरंगाबाद – मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने येत्या 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत तिरंगा रॅली होणार होती. मात्र त्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याबाबत खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासदार जलील यांनी यासंदर्भात एक ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. खासदार जलील यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, राष्ट्रवादी … Read more

मराठवाड्यातील 23 नगरपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजले 

औरंगाबाद – राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी काल राज्यातील 105 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. यात मराठवाड्यातील 23 नगर पंचायतींचा समावेश आहे. या नगरपंचायतीने साठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार असून संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवणार या उमेदवारांना नामनिर्देशन … Read more