शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने केला हल्ला

औरंगाबाद – शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना जिल्ह्यातील वसई (ता.सिल्लोड) येथे रविवारी (ता.१४) सकाळी आठच्या सुमारास घडली. शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने बाजुचे शेतकरी मदतीला धावल्याने त्याचा जीव वाचला. दिलीप नारायण सरोदे (वय ४८) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, दिलीप सरोदे हे नेहमीप्रमाणे आपली पाळीव … Read more

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन शिक्षकांना ‘झटपट’ शिक्षा

Court

औरंगाबाद – महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन शिक्षकांना परिस्थितीजन्य पुराव्‍यांच्या आधारे पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए. एस. खडसे यांनी ठोठावली. विशेष म्हणजे, गुन्‍हा दाखल झाल्यानंतर ९ महिन्‍ंयातच आरोपींना शिक्षा ठोठाविण्‍यात आली आहे. अनुप दामोधर राठोड (वय ३१, रा. आंबा तांडा ता. कन्‍नड) आणि संदीप हरिचंद्र शिखरे (व. ३२, रा. … Read more

औरंगाबादेत कलम 37 (1) (3) अंतर्गत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू

nikhil gupta

औरंगाबाद – औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अंतर्गत जिल्ह्याच्या शहरी हद्दीत आगामी 25 नोव्हेंबर पर्यंत शस्त्र बंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कळविले आहे. त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. अमरावती आणि नांदेडमध्ये याचे … Read more

शिवसेनेच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणारे मनसेचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

mns

औरंगाबाद – शहरात आज शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगताना दिसत आहे. देशातील महागाईच्या विरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येत आहे. तोच दुसरीकडे शिवसेनेच्या या मोर्चाच्या विरोधात मनसेचा प्रतिमोर्चा काढण्यात येत आहे. मात्र तत्पुर्वी शांततेच्या कारणास्तव औरंगाबादच्या पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे काल यांनी या … Read more

वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेचा औरंगाबादेत ‘आक्रोश’

  औरंगाबाद – वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाला औरंगाबादमध्ये सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. औरंगाबादचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांति चौकातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले असून हा मोर्चा क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत निघाला. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल आदी … Read more

सिडको परिसरात हॉटेलमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

marhan]

औरंगाबाद – शहरातील नेहमी गजबजणाऱ्या सिडको परिसरातील सावजी हॉटेलमध्ये एका तरुणावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत आनंद ढगे (27, रा. आनंद नगर, चिकलठाणा एमआयडीसी) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात घटनेची … Read more

न्यायाधीशांना भेटनाचा हट्ट करून न्यायालयात वकिलानेच केला आरडाओरडा

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – न्यायाधीशांना भेटण्याचा हट्ट करून न्यायालयात आरडाओरड करीत कक्ष अधिकाऱ्यांचा हात पकडून न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या वकिलाला पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१२) दुपारी अटक केली. राजेंद्र बाजीराव जाधव (वय ३६, रा. टाकळी माळी, पिंप्रीराजा, ता.जि. औरंगाबाद) असे वकिलाचे नाव आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत हर्सूल तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी … Read more

एसटीचा तिढा कायम ! कर्मचारी संपावर तर महामंडळ निलंबनावर

औरंगाबाद – एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाईचा धडाका सुरूच असून काल औरंगाबाद विभागातील आणखी दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात सिडको बस स्थानकातील पाच आणि पैठण आकारातील पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांना मध्ये संतापाची लाट उसळली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून तिसऱ्या दिवशी लढा सुरूच राहिला. औरंगाबाद शहरातील … Read more

‘त्या’ आठ वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूचे गूढ उकलले

Crime

औरंगाबाद – व्यसनाधिनतेतुन ग्रासलेल्या बापानेच पोटच्या ८ वर्षीय मुलीला दोरीने गळफास देऊन संपविले. मात्र, मुलीनेच फाशी घेतली असा बनाव केला होता. बुधवारी (ता.१०) पत्नीच्या फिर्यादी वरून करमाड (ता.औरंगाबाद) पोलिस ठाण्यात अखेर पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा अवघ्या ४८ तासात करमाड पोलिसांनी छडा लावला. दगडू चंद्रभान पाचे (रा.गोलटगाव ता.जि. औरंगाबाद) असे … Read more

भाजपतर्फे विधान परिषदेत पोटनिवडणुकीसाठी संजय केणेकरांचे नाव निश्चित

kenekar

औरंगाबाद – भारतीय जनता पार्टी तर्फे विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी औरंगाबादचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच औरंगाबादमधील डॉ. भागवत कराड यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी स्थान दिले आहे. यातच आता विधान परिषदेसाठी संजय केनेकर यांनी उमेदवारी निश्चित करण्यात आल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद वर भाजपचे विशेष लक्ष असल्याचे दिसत … Read more