औरंगाबादेत कलम 37 (1) (3) अंतर्गत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू

औरंगाबाद – औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अंतर्गत जिल्ह्याच्या शहरी हद्दीत आगामी 25 नोव्हेंबर पर्यंत शस्त्र बंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कळविले आहे.

त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. अमरावती आणि नांदेडमध्ये याचे पडसाद दिसले. अमरावतीमध्ये संचारबंदी लागू केली आहे. मोर्चे आंदोलने काढण्यात येत आहेत. हिंसेचे राजकारणही होता हे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत राजकारणी वातावरण तापवत आहेत. औरंगाबाद शहर संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते.

याच पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 25 नोव्हेंबर पर्यंत पोलीस आयुक्तांनी शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे.

You might also like