आधी इफ्तार मग सभा ! इम्तियाज जलील यांचे राज ठाकरेंना आमंत्रण

औरंगाबाद – राज ठाकरे साहेब येणार आहेत. त्यांची सभा होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी इफ्तार पार्टीला यावे, असे आमंत्रण खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. आज औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जलील म्हणाले, दोन वर्ष कोरोनामुळे सणावर परिणाम झाला आहे. 99 टक्के … Read more

राज ठाकरेंच्या सभेविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

Raj Thackeray

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात राज ठाकरे यांची सभा होणार असून त्यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिक युवा मोर्चाचे जयकिसन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली असून 1 मे रोजी राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होणार आहे. राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात काही निर्देश देण्यात यावेत तसेच त्यांची औरंगाबादेतील सभा होऊ नये … Read more

…तर राज ठाकरे तुमची सभा उधळून लावू ; ‘या’ संघटनेने दिला थेट इशारा

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे प्रमुख राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अटींसह परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सभा होण्यापूर्वीच आता त्याला विरोध करण्यात आलेला आहे. राज ठाकरे यांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे, अटींचे पालन न केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला … Read more

ईदनंतर लेबर कॉलनीतील घरे होणार जमीनदोस्त

dangerous buildings in Aurangabad

औरंगाबाद – विश्‍वासनगर-लेबर कॉलनीची जागा रिकामी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून तेथील रहिवाशांनी जागेचा ताबा सोडावा, कायद्याचा आदर राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. ताबा न सोडल्यास ईदनंतर ही जागा मोकळी करून घेण्यासाठी कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. विश्‍वासनगर-लेबर कॉलनी येथील जागा मोकळी करण्याच्या … Read more

राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी; पोलिसांनी घालून दिल्या 16 अटी

Raj Thackeray

औरंगाबाद- मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. आज सायंकाळी पोलिसांनी एकूण 16 अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे. राज ठाकरे 29 आणि 30 एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. … Read more

औरंगाबादेत सूर्य ओकतोय आग; दोन वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद

summer

औरंगाबाद – सूर्य एप्रिलअखेरीस अक्षरश: आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. शहरात बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील आणि गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी 42.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. वाढत्या तापमानाने औरंगाबादकरांच्या जिवाची काहिली होत आहे. ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान गेल्या आठवड्यात घसरले होते. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची काहीशी सुटका झाली होती. शहरात रविवारी 37.2 … Read more

अखेर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी; ‘या’ 10 अटींवर होणार सभा..?

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केले होती. मात्र, सभेला पोलीस परवानगी देणार का? असा प्रश्न पडला असताना आता पोलिसांकडून ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली जात आहे. मात्र, सभेपूर्वी अटी आणि शर्थी घालण्यात आल्या … Read more

राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का ? आज होणार निर्णय

raj thackeray

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. पण या सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. दरम्यान, आज या परवानगीबाबत सर्वंकष चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. निखिल गुप्ता म्हणाले, “आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आणि … Read more

लाकडाने डोक्यात वार करून सुनेने केला सासूचा खून

औरंगाबाद – नेहमीच वाद होणाऱ्या सुन व सासुच्या झालेल्या भांडणात शेवटी सुनेने घरातील चुली शेजारील जळक्या लाकडाने सासुच्या डोक्यात वार करुन खुन केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पाटेगाव (ता.पैठण) येथे बुधवारी घडली. कौसाबाई अंबादास हरवणे (वय ५५) असे खुन झालेल्या सासुचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुन कांचन गणेश हरवणे व सासू कौसाबाई हरवणे … Read more

गुन्हे शाखेची मोठी कारवाई! हवाला रॅकेटचा पर्दाफाश करत 1 कोटींची रोकड जप्त

औरंगाबाद – तांदळाच्या दुकानातून हवाला रॅकेट चालवणाऱ्या एकाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. शहरातील शहगंजहून चेलीपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुरेश राईस किराणा दुकानात छापा मारून पोलिसांनी ही कारवाई केली. मंगळवारी संध्याकाळी गुन्हेशाखेने ही कारवाई करत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. या ठिकाणाहून तब्बल 01 कोटी साडेनऊ लाख रुपये जप्त करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येथील किराणा … Read more