शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज, बन्सीलालनगर आरोग्य केंद्रात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यापूर्वी  ८  मार्च रोजी पहिली लस घेतली होती. जगभरात आलेले कोरोनाचे संकट लवकरच दूर होईल,  मात्र तत्पूर्वी सर्वांनी उपयोजनाचे पालन करावे. मास्क वापरणे,  हात धुणे,  अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करावा. तसेच सर्वांनी लसीकरण करावे, असे आवाहन शिवसेना नेते … Read more

कुंभमेळ्यावरून येणाऱ्या भाविकांची कोरोना तपासणी करा

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाटयाने वाढत असताना आणि शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असताना कुंभमेळ्यावरून येणाऱ्या भाविकांची कोरोना तपासणी करा, अशी जोरदार मागणी एमआयएम पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कुणाल खरात यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आमच्या हॅलो महाराष्ट्रच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, शहरात कुंभमेळ्यावरून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते,. अश्यावेळी … Read more

बंदी आदेश असतानाही शहरात दारू विक्री सुरूच

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाटयाने वाढत असताना आणि शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असताना खडकेश्वर येथील हाॅटेल ब्लू हेवन बारवर दुकानाच्या बाजूला उभे राहून दारूची विक्री करताना पोलिसांनी एकास रंगेहात पकडल्याची घटना आज घडली आहे.  ही कारवाई क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डाॅ. गणपत दराडे यांच्या पथकाने केली. या ठिकाणी वाईन व … Read more

पहिली पत्नी असतानाही पतीने थाटला दुसरा संसार

औरंगाबाद : मुलगा होत नसल्याचे सांगत पहिल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दुसरा संसार थाटला. याशिवाय पहिल्या पत्नीकडे फ्लॅटचे हप्ते फेडण्यासाठी पैशांची मागणी करुन तिला घराबाहेर हाकलले. हा प्रकार 16 ऑक्टोबर 2020 रोजी घडला होता. त्यावरुन पती सचिन शांतवन गायकवाड,  सासरा शांतवन बंडू गायकवाड व सासू लता शांतवन गायकवाड यांच्याविरुध्द मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात रविवार, 18 … Read more

चिंताजनक : औरंगाबाद शहरात एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही

औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या उद्रेकामुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत नसली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे.  त्यामुळे आरोग्य सुविधा अपूरी पडत आहे.  आजघडीला शहरात 235 व्हेंटिलेटर बेडपैकी एकही बेड शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी समोर आली.  या परिस्थितीमुळे सुविधेअभावी रुग्णांचा मृत्युदर आणखी वाढण्याची भीती व्यक्त … Read more

विद्यापीठाने नाकारलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने आपल्याच आजी-माजी आमदारांना महाविद्यालयांची खैरात वाटल्याचे समोर आले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 238 महाविद्यालयांचे प्रस्ताव यापूर्वी उधळून लावले होते.  माञ विद्यापीठाच्या भूमिकेला आपल्या लाडक्या आजी-माजी आमदारांसाठी राज्य सरकारने सर्व नियमांना डावलून 48 महाविद्यालयांना मंजूरी दिली आहे.  मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात बामूची व्यवस्थापन परिषद सदस्यांची टीम उभी राहण्याची शक्यता … Read more

सिटीस्कॅनसाठी जास्त दर आकारल्यास कारवाई होणार

औरंगाबाद : खासगी रुग्णालयांत मागील काही दिवसांपासून गरज नसतानाही कोरोना रुग्णांची सिटीस्कॅन चाचणी केली जात आहे.  यासाठी मनमानी शुल्कही आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने शासन निर्देशांनुसार खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन तपासणी केंद्रांना सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करून दिले आहे. यापेक्षा जास्त दराने आकारणी केल्यास संबंधित खासगी रुग्णालयासह सिटीस्कॅन तपासणी केंद्रावर थेट कायदेशीर … Read more

आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे आहे, ठराविक जिल्ह्याचे नाही- खासदार जलील

औरंगाबाद :  महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री रेमडेसिव्हिर वाटपाच्या बाबतीत भेदभाव करत आहेत.  आरोग्य मंत्री राजेश टोपे,  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आपापल्या जिल्ह्यात अधिकच्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेऊन जात आहेत.  आमच्याकडे मंत्री नसेल तर आम्हाला इंजेक्शन मिळणार नाही का ? आम्ही लावारिस आहोत का? अशा शब्दात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला. राज्यात सर्वत्र … Read more

सर्व रुग्णालयांनी ऑक्सीजनचा सुयोग्य वापर करावा

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुणांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून लिक्वीड ऑक्सीजनसाठा जिल्ह्यात मुबलक उपलब्ध आहे.  परंतु भविष्यातील परिस्थितीचा विचार करुन आत्ताच नियोजन करणे गरजेचे असल्याने सर्व रुग्णालयांनी ऑक्सीजनचा सुयोग्य वापर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या निदानासाठी करण्यात येत … Read more

जिल्ह्यात 1493 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद :  जिल्ह्यात आज 1578 जणांना (मनपा 900 , ग्रामीण 678) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 92683 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  आज एकूण 1493 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 110493 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2180 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15630 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.  … Read more